There is no Vaidik Invasion
वैदिकांनी आक्रमण केले नाही. ते शस्त्रांनी कधेच लढले नाही. ते ग्रंथांतून विकृत्या पसरवत जिंकत राहिले. अगदी आजही महात्मा गांधी, आंबेडकर, पटेल यांचे कसे अपहरण करताहेत ते बघताय ना? ते लढत नाहीत पण बुद्धीभेद करतात. हिंदू या बुद्धीभेदाच्या हत्याराला बळी पडले. हिंदुंच्याच गोष्टी वैदिक वेष्टणात गुइंडाळुन दिल्यामुले हिंदु फसले. उदा. भक्ती मार्ग हिंदुंचाच. पण त्याचे थोतांड त्यांनी वाढवले. व्यक्तीगत पातलीवर असणा-या भक्तीला त्यांनी वैदिक सामुदायिक रुप दिले व मुळात नसलेले मुर्ती माहात्म्य वाढवले. चमत्कार कथा (अगदी संतांण्च्याही) बनवल्या. त्यामुळे हिंदू संतही वैदिकाळले गेले. आज स्वत:ला क्षत्रीय समजणारे वैदिकाळलेले हिंदू हे हिंदुंचे सर्वात मोठे शत्रू आहेत हे आपण विसरतो. संघात जानारेही वैदिकाळतात. आपण मंदिरांना देणग्या देतो, पण विचारांच्या प्रसारासाठी एक रुपया खर्च करत नाही. हा आपला दोष आहे. दुस-यांचे दोष महत्वाचे नाहीत. त्यावर चर्चा केल्याने आपले दोष दूर होत नाहीत. आपले दोष दुर केले तर हे बुद्धीभेदादी हत्यार कोणी वापरु शकणार नाही.
संजय सोनवनी sir
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1030560287076386
Comments
Post a Comment