असुद्या आम्ही राखीव जागा आंदोलक
असुद्या आम्ही राखीव जागा आंदोलक ,जगात कोणत्याच मानवगटाची स्थिती कायम राहिली नाही,मोठमोठ्या सभ्यता,साम्राज्ये,मोठमोठे राजे लयाला गेले तिथे आम्ही काय चीज आहे? आम्ही जर स्वार्थी विचार करून कायम महालात राहायचे ठरविले असते तर आज या देशाची संस्कृती आणि अस्मिता ही वेगळी असती,आम्ही वेळ पडली की दुर्गम भागात राहून शत्रूंशी दोन हात करायचो,नुसते महालात राहिलो असतो तर बाहेरच जग माहित झालं नासत,आम्ही तुम्हाला एक ठराविक काम दिल होत उदारणार्थ सचिव,पोतनीस,फडणवीस,कर्णिक,कारखानीस इत्यादी,त्यामुळे तुमच्या पोटा पाण्याची सोया झाली,तुम्ही नागरी जीवनाच्या संपर्कात आला त्यामुळे उतर्रोउत्तर तुमची प्रगती होत गेली,त्यामुळे आपण हा इतिहास विसरता कामा नये,नाहीतर भिक्षा मागून जगणारे लोक काही कमी नव्हते आणि त्यात वाईट असे काहीच नव्हते कारण तो धर्मकार्याचाच एक भाग होता. ज्या ठिकाणी राजसत्ता होत्या त्या मराठवाडा,पैठण,बीदर,बदामी,विजयनगर भागात आज ही आमच्या हजारो एकर जमिनी आहेत.