हमदान आणि झणजंन हि दोन्ही शहरे ईराणच्या पर्वतीय क्षेत्रात आहेत.एकबताना हे "हमदान" शहराचे ऐतिहासिक नाव. हमदान शहराची स्थापना "मिदि" वंशाचे सम्राट "हवक्षत्र महान" यांनी केली होती. एकबताना हे नाव "अजा-एक-पदा" वरून आले आहे. एक पायाचा मेंढा "मदन" लोकांची मुख्य देवता होती. एकबताना किंवा हंगमेताना म्हणजे एकत्र जमण्याचे पवित्र स्थळ. ईजिप्त चा अर्थ हि काहीसा असाच आहे. "हाट-का-पताह" (ईजिप्त), हाट म्हणजे स्थान,का-म्हणजे एकच आत ्मा,पताह म्हणजे ईश्वर,हाट-का-पताह" म्हणजे सर्वोच्च पित्याच्या आत्म्याचे निवास्थान. मदन,मोरी म्हणजेच यहुदी,पारसी,अरब आणि अराम हे लोक भटके लोक होते आणि परस्परांचे नातेवाईक होते.मूलतः या जमाती होत्या परंतू नंतर यांच्यातून स्वतंत्र धर्म निर्माण झाले. यांच्यापैकी अराम लोकांकडे लिपी होती. परंतू या लिपीला अजून राजाश्रय मिळाला नव्हता. मदन वंशाचे सम्राट हवक्षत्र महान यांनी या लिपीला राजाश्रय मिळवून दिला.इतिहासात पहिल्यांदाच या भटक्या जमातींना राजवैभव अनुभवायला मिळाले. अनेक अरब,अराम आणि यहुदी लोक या...