आमच्या गावातील किल्ला
गावात एक किल्ला आहे.किल्याचा एकंदर आकार पाहता ही गढी असावी.ही गढी कधी बांधली याचा काही लिखित पुरावा नाही आहे परंतू या ठिकाणी लढाईच्या खुणा आहेत.कदाचित सुल्तानी आक्रमणामुळे येथील लोक विखुरले असावेत.आम्ही ही गढी असलेल्या सुपिक गावात राहतो परंतू आमचे सर्व नातेवाईक हे आजूबाजूच्या दुष्काळी गावांत पसरले आहेत. गांव फलटण पासून ८० किमी अंतरावर आहे.फलटण लाही अशीच गढी आहे आणि फलटणच्या या गढीत सुद्धा आक्रमण झाले होते आणि या गढीत राहणारे लोक आजूबाजूच्या दुष्काळी भागात पसरले होते असे लोक अजूनही बोलतात परंतू याचा काही लिखित पुरावा नाही आहे कारण इतिहास हा जेत्यांनी लिहलेला असतो आणि तत्कालीन छोट्या गावांतील इतिहास हा लिखित राहत नसतो किंवा तो नष्ट केला जातो.
Comments
Post a Comment