ईराणच्या हमदान आणि झणजंन शहरांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा
हमदान आणि झणजंन हि दोन्ही शहरे ईराणच्या पर्वतीय क्षेत्रात आहेत.एकबताना हे "हमदान" शहराचे ऐतिहासिक नाव. हमदान शहराची स्थापना "मिदि" वंशाचे सम्राट "हवक्षत्र महान" यांनी केली होती. एकबताना हे नाव "अजा-एक-पदा" वरून आले आहे. एक पायाचा मेंढा "मदन" लोकांची मुख्य देवता होती. एकबताना किंवा हंगमेताना म्हणजे एकत्र जमण्याचे पवित्र स्थळ. ईजिप्त चा अर्थ हि काहीसा असाच आहे. "हाट-का-पताह" (ईजिप्त), हाट म्हणजे स्थान,का-म्हणजे एकच आत्मा,पताह म्हणजे ईश्वर,हाट-का-पताह" म्हणजे सर्वोच्च पित्याच्या आत्म्याचे निवास्थान.
मदन,मोरी म्हणजेच यहुदी,पारसी,अरब आणि अराम हे लोक भटके लोक होते आणि परस्परांचे नातेवाईक होते.मूलतः या जमाती होत्या परंतू नंतर यांच्यातून स्वतंत्र धर्म निर्माण झाले. यांच्यापैकी अराम लोकांकडे लिपी होती. परंतू या लिपीला अजून राजाश्रय मिळाला नव्हता. मदन वंशाचे सम्राट हवक्षत्र महान यांनी या लिपीला राजाश्रय मिळवून दिला.इतिहासात पहिल्यांदाच या भटक्या जमातींना राजवैभव अनुभवायला मिळाले. अनेक अरब,अराम आणि यहुदी लोक या प्रमुख दोन शहरांत स्थायिक होऊन शिक्षित झाले. अरबी आणि हिब्रू लिपी या अराम लोकांच्या लिपीतून बाहेर निघाल्या आहेत.
खामेश हे झणजंन शहराचे प्राचीन नाव. प्राचीन काळी या ठिकाणी "झंजे" लोकांचे राज्य आहे. झंज हा अरबी शब्द आहे. झंज म्हणजे काळे लोक. प्राचीन ईराकच्या सुमेरियन लोकांच्या भूमीला सुद्धा काळ्या आणि शाही अधिपतींची भूमी म्हटले जायचे. अलेक्सान्डेरच्या पर्शियाच्या आक्रमणामुळे या लोकांनी हि भूमी सोडली होती. परंतू अरबी लोकांच्या मनात या लोकांच्या आठवणी जिवंत होत्या.
सहाव्या शतकांत अरबी लोकांनी पारसी "ससानी" वंशाच्या राजांना हरविले.अरबांनी या दोन्हीहि ऐतिहासिक शहरांची नावे बदलून "हमदान" आणि "झणजंन" अशी ठेवली. अरबी भाषेत हमदान म्हणजे आदरणीय व्यक्ती किंवा लोक. "झणजंन" हा ईराणमधील सर्वात जास्त समृद्ध लोकांचा प्रांत आहे.
झंजे हे आमचे पाहुणे आणि आमच्या गावातील सर्वात मोठे जमीनदार. त्याकाळी त्यांच्याकडे ५०० एकर जमीन होती.त्यांनी बरीच जमीन गावातील शाळेला दान केलेली आहे. त्यांचे गावात एकच घर परंतू जमीन दान केल्यामुळे गावाला झंजेवस्ती हे नाव मिळाले. आमच्याकडे गावाची पाटीलकी होती परंतू आमची बरीच कुटुंबे असल्यामुळे जमिनीची फार वाटणी झाली.एकच घर आणि एवढी मोठी जमीन असल्यामुळे त्यांचा गावात फार थाट होता. ३० वर्षांपूर्वी कार आणि गावातील पहिला आणि तोही रंगीत टीव्ही यांच्याकडे होता.
झंजे हे फार "हँडसम" लोक. यांच्याकडे बघितल्यावरती मला शक क्षत्रप रुद्रदामन आणि रुद्रासिम्हाची आठवण येते.
Comments
Post a Comment