बेगोस,पर्शियाचा कुटिल प्रधानमंत्री
अलेक्झांडरच्या काळात बेगॉस हा पर्शियाचा अतिशय कुटिल प्रधानमंत्री होता. मूलतः तो गुलाम वंशाचा होता आणि अविवाहित होता. तो लोकांवरती विषप्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने पर्शियन राजपरिवारातील ९ लोकांची हत्या करून दारा-३ (मूळ नाव अर्थशथा) ला गादीवरती बसविले.अलेक्झांडरशी हातमिळवणी करून दारा-३ ला सुद्धा पराभूत केले.क्षत्रपांच्या पाठिंब्यामुळे हा प्रधानमंत्री शक्तिशाली झाला होता. यानेच अलेक्झांडरला सुद्धा विषप्रयोग करून मारले होते.शशीगुप्त (Sasicotts) आणि रॉक्सान याचे विश्वासू क्षत्रप होते. बेगॉस आणि शशीगुप्त अलेक्झांडरला एकदा भेटले होते. त्यावेळेस शशीगुप्त ने अलेक्झांडरचा विश्वास संपादन केला होता. रॉक्सान पहिल्यांदा आपला स्वामी "दारा-३" च्या बाजूने होता परंतू बेगॉस आणि शशीगुप्त त्याचे मन वळविण्यात यशस्वी झाले आणि पूर्वेकडे भारतापर्यंत साम्राज्य स्थापण्यात यशस्वी झाले.
एकदा बेगॉस ने दारा-३ ला सुद्धा विष पाजण्याचा प्रयत्न केला होता परंतू दारा-३ ने ते विष त्यालाच प्यायला लावले परंतू बेगॉस हा विषप्रयोग शक्ती वाढविण्यासाठी रोज थोडे थोडे विष स्वतः घ्यायचा आणि यातून तो वाचला आणी नंतर भूमिगत होऊन अलेक्झांडरला जाऊन मिळाला परंतू या धूर्ताने अलेक्झांडरवरती सुद्धा विषप्रयोग करून मारले.
Comments
Post a Comment