भारतीय,हिब्रू आणि अरबी लिपींचे मूळ
प्राचीन सिरियात "अराम" नावाचे क्षेत्र होते. हा भाग वाळवंटी होता आणि आजही आहे. या भागातील लोक निमभटके होते. नंतर या लोकांनी शहरे हि निर्माण केली. या लोकांकडे त्यांची स्वतः ची लिपी होती.यांची भाषा सेमिटिक परिवारातील होती. त्यांच्या भाषेला अरामी भाषा म्हटले जायचे. येशू ख्रिस्त यांची भाषा हि "अरामी" होती.इसवी.पूर्व सातव्या शतकांत "मिदि" लोकांनी मोठे साम्राज्य निर्माण केले."मिदि" वंशाचे सम्राट "हवक्षत्र महान" यांनी या लिपीला राजलिपीचा दर्जा दिला.
"हवक्षत्र महान" यांचा नातू "सायरस" दि ग्रेट याच्या काळात "अराम" लिपीचा भरभराट झाला. पुढे पारसी,अरब आणि यहुदी लोकांनी हि हीच लिपी वापरली. नंतर जेव्हा ८०० वर्षानंतर अरबांकडे सत्ता आली त्यावेळेस "मिदि" आणि आणि झंज लोकांची आठवण म्हणून अरबांनी या शहरांची नावे बदलून "हमदान" आणि "झंजा" अशी ठेवली.
भारतात सर्वात अगोदर सम्राट अशोकाने जे ब्राम्ही लिपीत शिलालेख लिहिले होते त्या ब्राह्मीचे मूळ "अराम" लिपीत आहे. मिदि साम्राज्य नंतर पर्शियन साम्राज्य त्यानंतर मौर्य साम्राज्य असा नियोजनबद्ध क्रम आहे. त्यानंतर शक क्षत्रप रुद्रदामन यांनी संस्कृत भाषेतील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला.
Comments
Post a Comment