गुरुकुल वास्तव आणि मिथक
गुरुकुल वगैरे सर्व काल्पनिक आहे,एकही शोध लागला नाही त्या गुरुकुलात,साध्या एका घड्याळाचा शोध लागला नाही त्या गुरुकुलात आणि लोक म्हणतात भारत हा विश्वगुरू होता. जे लोक स्वतः अशिक्षित होते ते लोक क्षुद्रांना काय शिकवणार? अरबांच्या सुवर्णकाळात एवढे विद्वान घडले होते ते कोणत्या गुरुकुलात शिकले होते? अल-जेब्राचा निर्माता हा अल-ख्वारिझम आहे. अल -जेब्रा हा अरबी शब्द आहे. अल-जबीर म्हणजे सुट्ट्या वस्तूंची जुळवाजवळ करणे होय.
उलट आजचे शिक्षण हे दर्जेदार आहे जे अरब आणि यूरोपियन लोकांनी जगात पसरवले आहे. या लोकांनी आधुनिक संशोधनात फार मेहनत घेतली आहे.गुरुकुल श्रेष्ठ होते असे सांगून जे लोक आधुनिक शिक्षण घेत आहेत त्यांच्या मनात भ्रम निर्माण केला जात आहे. समाजातील सर्व लोक शिक्षण घेत आहेत म्हणून काही ठराविक लोकांच्या पोटात दुखत आहे.
Comments
Post a Comment