मनुष्य उत्क्रांति सिद्धांत हेच अंतिम सत्य आहे

हा सैफ आसरे काहीही चुकीची माहिती  पसरवत आहे. हा यहुदी लोकांनी रचलेल्या कथा सांगत आहे. याला काहीही ऐतिहासिक आधार नाही. हे लोक आणि वैदिक काल्पनिक कथा रचण्याच्या बाबतीत एकाच माळेचे मणी आहेत. अर्थात प्रत्येक मिथकात १%  खरा इतिहास लपलेला असतो तो आपल्याला शोधावा लागतो. यांच्या कथांमुळे आपली खरा इतिहास शोधण्यासाठी कुतुहलता वाढते. यांना यांचे काम करू द्या. 

आदिमानवाची अश्मयुगातील जी हत्यारे सापडतात ती पण अल्लाहानेच बनवायला शिकविली काय? लिपि पण जर अल्लाहानेच शिकविली तर अरब लोक हजारो वर्षे भटक्या अवस्थेत का जगले? अरब लोक लिपि कधी शिकले आणि अरबी ग्रंथ कधी लिहले? गिल्गमेश चे पुराण किती प्राचीन आहे माहित आहे काय? अरब लोक हे प्रँक्टिकल माईंडेड आहेत परंतू तुम्ही लोक सर्व गोष्टी या अल्लाहावरतीच ढकलता.ते जर तुमच्यासारखे असते तर दुबई सारखी शहरे निर्माणच करु शकले नसते.

नुह किंवा मनू हा भारतीय होता आणि त्याची जन्मभूमी अयोध्या होती. मुस्लिम लोकांत सुद्धा नुह ने आदम पूल किंवा रामसेतू पार केला होता अशी श्रद्धा आहे. R1a1--- हा आर्यांचा मुख्य पितृवंश जो भारतीय आणि यूरोपीय लोकांत मोठ्या प्रमाणात आणि अरबस्तानात अगदीच नगण्य आहे.अनुवांशिकतेचा काहीतरी ताळमेळ ठेवा सैफ आसरे महाशय .

नोह/ मनू आणि त्याची येमेनी पत्नी
मनू ची एक पत्नी येमेनी होती असा मुस्लिम ग्रंथात संदर्भ मिळतो. प्रत्येक मिथकात १% खरा इतिहास लपलेला असतो. भारतातील पशुपालक लोकांत अरब महिलावंश मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्यांचे अरबस्तानात सुमारे २५०० वर्ष वास्तव्य होते याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात.परंतू त्या भागातील प्राचीन सर्व सभ्यता या मूर्तिपूजक होत्या.


धर्म स्थापन करणारे अरब हे भटकेच होते आणि भटके लोक वाईट असतात असे काही नाही,उलट स्थिर झालेले लोक जास्त माजलेले असतात परंतू भटक्या लोकांत दया जास्त असते,जगातील प्रमुख धर्मांचे संस्थापक हे भटके होते म्हणून त्यांची नावे कोणत्याही शिलालेखात सापडत नाहीत.



कुहतानी हे मूळ अरब नाही आहेत. मूळ अरब हे अदनानी अरब म्हणजे प्रेषित मुहंमद यांची कुरेशी हि जमात आहे ज्यांचे मूळ सिरियातील "कादिर/केदार" या जमातीत आहे. तुम्ही कादिर या जमातीचा अभ्यास करा. कादिर हि प्रेषित अब्राहम चा  इश्माएल चा वंशज होता. कादिर जमातीचा उल्लेख इसवी.पूर्व. ७ व्या शतकातील शिलालेखात सापडतो. कादिर लोक भटके होते. 



कुहतानी हे फार खुंखार होते ज्यांचा प्रेषित मुहंमद यांनी त्यांच्या सैन्यात वापर केला होता. कुहतानी हे दक्षिण अरबस्तानातील स्थिर झालेले लोक होत. परंतू मक्केतील शासक जमात हि प्रेषित मुहम्मद यांची कुरेशी हीच जमात होती. बरेच कुहतानी हे व्यापारी होते. कुहतानी लोकांचे येमेन भागात फार प्रमाण आहे आणि हे लोक येमेनमधील कट्टरपंथी आहेत.



Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).