प्राचीन काळांपासून पशुपालन करणारा समाज म्हणजे - धनगर समाज !
प्राचीन काळांपासून पशुपालन करणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! आपल्या पशुपालन या पारंपारीक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनूसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! पण असे असून देखील आपले सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवन करणारा समाज म्हणजेच - धनगर समाज ! प्रामुख्याने गाई, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या अशा दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्या या धनगर समाजाचा उल्लेख आजकाल फक्त मेंढपाळ या अर्थाने केला जातोय. मेषपालन करणारा समाज धनगर आहेच पण धनगर शब्दाची व्याप्ती फक्त मेषपालनापर्यंतचीच नाही तर ती दुभत्या पशुपालनापर्यंत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, दुभत्या जनावरांचे पालन करणारा समाज म्हणजेच धनगर समाज. वैदिकाची ॠषी परंपरा (Vaidic sanskriti is also developed by ancient Hotar/Hatti tribe of Shepherds.) ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे . हलू म्हणजे दूध दुधावर जगनारा म्हणजे हा धनगर समाज .हलसिध्दनाथाची(अप्पाचीवाडी) भाकणुक आजह...