श्रीधुळोबा, देवी भिवाई संबंधित वाघमोडे आणि शिंदे घराण्याविषयी उपलब्ध झालेली माहिती.
श्रीधुळोबा, देवी भिवाई संबंधित वाघमोडे आणि शिंदे घराण्याविषयी उपलब्ध झालेली माहिती.
वाघमोडे हे आडनाव कसे पडले यावरून वेग-वेगळी मते आहेत. काहींच्या मते त्यांनी वाघ (प्राणी) याचा बंदोबस्त केला म्हणून हे आडनाव पडले किंवा वाघासारखी गरिबांची शिकार करणारे, आपली मातृभूमी लुटणारे शत्रू यांचा त्यांनी बिमोड केला म्हणून वाघमोडे असे म्हटले जाते. त्यामुळे जोपर्यंत काही अस्सल लिखित पुरावा मिळत नाही तोपर्यंत तरी नक्की कशावरून वाघमोडे नाव पडले सांगता येणार नाही. वाघमोडे यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्हा असल्याचे सांगितले जाते.
वाघमोडे हे ३२ कुळी क्षत्रिय हटकर आहेत. वाघमोडे घराण्याच्या कुलवृत्तांताविषयी अधिक माहिती सध्यातरी मला कुठे मिळाली नाही, पण महाराष्ट्रातील मेंढपाळ समाजाविषयी करीत असलेल्या अभ्यास संशोधनातून उत्तर हिंदुस्थानातून जी क्षत्रिय घराणी महाराष्ट्रात आली व त्यांनी लढाऊ बाण्याबरोबरच मेष-पालन व गो-पालन ही केले अश्या घराण्यांच्या कुळांची एक यादी मिळाली आहे. त्यानुसार वाघमोडे घराणे हे चंद्रवंशी क्षत्रिय असून ते यादव कुळातील आहेत. ही यादी गणपतराव कोळेकर यांनी १९८१ साली 'धनगर समाजाची गोत्रे' या पुस्तकातून प्रसिद्ध केली आहे, तसेच मेंढ्जोगी व राजस्थानातील भाट लोकांकडे या कुळांची माहिती उपलब्ध आहे. दिलेली यादी बरोबर आहे कि नाही याबद्दल वेग-वेगळी मते असू शकतात पण जोपर्यंत सर्व आडनावाच्या वंशावळी मिळत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. तरीसुद्धा दिलेल्या यादीप्रमाणे वाघमोडे कुळाची एक वंशावळ राजस्थानातील एका भाटाकडे उपलब्ध झाली आहे. लवकरच याबाबत मी अधिक माहिती इथे देईन.
वाघमोडे घराण्याच्या इतिहासावर अजून पूर्णपणे अभ्यास झाला नाही, तरी पण 'यदुवंशी धनगर- ग्वाला समाज का इतिहास - मधुसूदनराव होलकर' या पुस्तकात १७ व्या शतकाच्या मध्यात वाघमोडे एक सरदार घराणे होऊन गेले याबाबत उल्लेख आढळतो.
श्रीधुळोबा, देवी भिवाई संबंधित वाघमोडे आणि शिंदे घराण्याविषयी उपलब्ध झालेली माहिती.
वाघमोडे घराण्याशी संबंधित एक लोककथा मिळाली आहे. Anne Feldhaus नावाच्या एका परदेशी महिलेने 'मराठी साहित्य आणि धर्म यामधील महिलांचे स्थान' याबाबत एक संशोधन करून पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये कोल्हापुरातील भिवाई आणि मिठाबाई, धुळोबा या देवतासंबंधी एक भाग आहे. त्यात असे लिहिले आहे कि भिवाई आणि मिठाबाई, धुळोबा याबाबत एक लोककथा त्या भागात प्रचलित आहे ती अशी कि, "
कमळू शिंदे या मेंढपाळ करणाऱ्याचा एक मुलगा होता त्याचे नाव धुळोबा होते आणि मुलगी भिवाई. त्यांनी मिठाबाई नावाच्या एका मुलीला पाहिले आणि स्वतःचा मुलगा धुळोबा याच्याबरोबर विवाहासाठी मिठाबाईच्या वडिलांना मागणी करण्यासाठी वाघमोडे राजांच्या वाड्यावर गेले. मिठाबाई हि एका श्रीमंत (धनिक) वाघमोडे राजाची मुलगी होती.
वाघमोडे राजाला हि सोयरिक खूपच वेगळ्या प्रकारची वाटत होती. त्यामुळे त्यांनी अशी अट घातली कि मुलीच्या वजनाएवढ धन (सोने) तुम्हाला द्यावे लागेल. पण शिंदेला धन म्हणजे काय हेच माहित नव्हते, त्याच्यासाठी त्याच्या मेंढ्याच त्याचे धन होत्या. म्हणून तो ९ लाख मेंढ्या घेऊन आला.
आणि त्या प्रत्येक मेंढी बरोबर एक सोन्याने भरलेली पिशवी होती. जेव्हा वाघमोडे यांनी 'तुला' करण्याचा समारंभ सुरु केला, त्यावेळेला 'तुला' काही पूर्ण होईना. शिंदे हे अजून सोन्याच्या पिशव्या घेऊन येत होते, तरीपण मिठाबाई इतक वजन त्या सोन्याचे होते नव्हते. त्या वेळेला धुळोबाने आपल्या वडिलांना सांगितले कि बहिण भिवाईची एक कानकुडी तिथे ठेवा. ती ठेवल्यानंतर 'तुला' पूर्ण झाली. आणि विवाह हि संपन्न झाला. आणि अश्या प्रकारे भिवाई बहिणीने धुळोबाला लग्न करण्यासाठी एक प्रकारे कानकुडी म्हणून भेटच दिली.
आजही कोल्हापूर भागातील काही वाघमोडे घराण्यांचे कुळदैवत धुळोबा आणि भिवाई देवी हे आहेत.
I think surname Waghmode must be derived from >>>>अजमीढ़ (अजमीढ़ साम्राज्य)

Comments
Post a Comment