प्राचीन ईराकच्या सुमेरियन सभ्यतेतील पुरोहित आणि त्यांची उत्त्पति
अगदी सुरुवातीच्या काळात जमातीतील काही व्यक्ती याच पुरोहित असायच्या.जमातीत ऋषी किंवा प्रेषित हे अतिशय कडक शिस्तीचे व्यक्तिमत्व असायचे.जमातीतील लोक आदराने त्यांना आबा किंवा अब्बा म्हणायचे. ऋषी किंवा प्रेषित हे राजकारणापासून दूर असायचे आणि जास्त वेळ शेळ्या-मेंढ्यां सोबत घालवायचे. जमातीतील इतर लोक काळेसावळे परंतू पुरोहित हे गोऱ्या रंगाचे असायचे कारण हे लोक शासक जमातीतील रांगडे पुरुष आणि कृषक जमातीतील सौम्य महिला यांच्या विवाह संबंधातून निर्माण झाले होते.त्यामुळे शासक मुलांपेक्षा पुरोहित हे अधिक प्रेमळ आणि विद्वान निर्माण झाले.
प्राचीन सुमेरियात राज्यात समृद्धता यावी म्हणून राजा आणि कृषक जमातीतील महिलांचे विवाह लावले जायचे. हे विवाह राजा आणि मातृदेवतेच्या विवाहांचे प्रतीक असायचे. देवी इनाना आणि मेषपाल देव "दुमीझिद" यांचा विवाह हा अतिशय महत्त्वाचा विधी होता. यात "दुमीझिद" ची भूमिका राजा आणि इनाना ची भूमिका कृषक समाजातील महिला पार पडायच्या.
पुरोहितांनी अतिशय पवित्र असावे अशी अपेक्षा असायची.कॅलेंडरचे नियोजन हे महत्त्वाचे काम त्यांच्याकडेच असायचे.विद्वान पुरोहित हे वृषभ राशीत म्हणजे एप्रिल- मे महिन्यात जन्माला यायचे.
जमातीतील इतर लोक हे अतिशय खंबीर व्यक्तिमत्त्व असायचे. त्यामुळे सायरस ,अलेक्सान्डर,अशोक आणि कनिष्क हे मेष आणि सिंह राशीत जन्माला आले.
नंतरच्या काळात वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दुसऱ्या जमातीतून पुरोहित निर्माण केले. याच कारणामुळे वाल्मिकी सारख्या भटक्या जमातीतील लोकांना ऋषी बनण्याची संधी सुद्धा मिळाली. तसेच काही ऋषीं हे कोळी समाजातील महिलांशी विवाह करू लागले. महर्षी पराशर आणि सत्यवती यांचा मुलगा महर्षी व्यास आणि विधुर हे त्याचे उदाहरण आहे.
Comments
Post a Comment