पाश्चिमात्य देशांत मुहूर्तांना का महत्त्व देत नाहीत ?
पाश्चिमात्य खगोलतज्ञ म्हणतात कि आम्ही प्राचीन ईजिप्तच्या "सौर" कॅलेंडरलाच मानतो.तारकापुंज,मुहूर्त किंवा ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या स्थानाला ते लोक महत्त्व देत नाहीत कारण त्यांचा प्रमाणिकरणावरती (Standardization) जास्त भर आहे. याच कारणामुळे मेष हि राशी त्यांनी मार्च-एप्रिल या कालावधीत कायमस्वरूपी स्थिर केली आहे जेणेकरून मुहूर्तांमुळे निर्माण होणारा किचकटपणा कमी होईल आणि एक प्रमाणबद्धता कायम राहील.कारण राशी या फिरून काही वर्षांनंतर परत त्यांच्या स्थानावरती येतात.
खर म्हणजे तारकापुंज किंवा राशी या आहे त्याच ठिकाणी आहे परंतू आपण फिरत असल्यामुळे आपणाला वाटते कि तारकापुंजच फिरत आहे जसे बस मध्ये बसल्यावरती आपणाला जाणवते कि झाडे पळत आहेत आणि आपण एकाच जागेवरती स्थिर आहे. परंतू आपल्या प्रवासातील काही मार्ग मात्र खडतर असतात हे खरं आहे आणि त्याच्यावरती आपल्यालाच मार्ग काढायचा असतो.
त्याच प्रमाणे १ जानेवारी आणि ३१ डिसेंबर या तारखा सुद्धा त्यांनी स्थिर केल्या आहेत. त्यामुळे काय होत आपल्याकडे दर तीन वर्षांनी येणार ३३ दिवसांचा जो अधिक मास आहे तो टाळला जातो आणि संभाव्य किचकटपणा कमी होतो.
कॅलेंडर अचूक ठेण्यासाठी त्यांच्याकडे लीप वर्ष हि संकल्पना आहे. दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात ते लोक १ दिवस वाढवितात.
आपले मुहूर्त धार्मिक कारणांसाठी फार अचूक आहेत परंतू आपल्या कॅलेंडर मध्ये फार किचकटपणा आहे आणि ११ दिवस अगोदरच आपले वर्ष संपत असल्यामुळे दर तीन वर्षांनी आपल्याला अधिक मासाची बेरीज करावी लागते.त्यामुळे आपले मुहूर्त आणि तिथी या सतत बदलत असतात.
धार्मिक दृष्टया जरी हे मुहूर्त आणि तिथी शास्त्रीय असले तरी त्याची "सौर" कॅलेंडर शी सांगड घातली तर ते सतत बदलत असतात.
या कारणासाठी प्राचीन सभ्यतेत धार्मिक कारणासाठी चंद्रावरती आधारित कालगणना आणि व्यवहारिक कारणांसाठी सौर कालगणनेचा वापर होत असे.
Comments
Post a Comment