भारतीय आणि पाश्चिमात्य राशींच्या काळातील फरक आणि कारणे
आधुनिक तारकासमूहांनुसार वसंतसंपात बिंदूने इ.स.पू. १८६६ साली वृषभ तारकासमूहातून मेष तारकासमूहामध्ये प्रवेश केला, इ.स.पू. ६८ साली मीन मध्ये प्रवेश केला. इ.स. २५९७ मध्ये हा बिंदू कुंभमध्ये प्रवेश करेल आणि इ.स. ४३१२ साली मकर तारकासमूहात.मेष हि राशीचक्रातील प्रथम राशी आहे. राशीचक्र काढताना मेषपासून घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने क्रमाने बाकी राशी काढल्या जातात. इसवी. पूर्व. ८०० मध्ये मेषराशीचा काळ हा २१ मार्च ते २१ एप्रिल होता. दर २००० वर्षांनंतर संपातबिंदू हा घड्याळाच्या फिरण्याच्या उलटया दिशेने म्हणजे कागदावरती पश्चिम दिशेला एक एक घर पुढे सरकतो. म्हणून आज संपातबिंदू हा मीन राशीत आहे. या कारणामुळे आज मेषराशीचा काळ हा १५ एप्रिल ते १५ मे म्हणजे २७०० वर्षांत मेष राशी हि एक घर पुढे सरकली आहे आणि तिचे स्थान आज मीन राशीने घेतले आहे. मीन राशीचा आजचा काळ हा १५ मार्च ते १४ एप्रिल हा आहे. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे हा काळ १९ फेब्रुवारी ते २१ मार्च हा आहे. राशीचा पहिला दिवस हा फार शुभ मानला जातो. माझी रास वृषभ आहे आणि तिचा काळ हा १६ मे ते १५ जून हा आहे. माझा जन्म हा १६ मेला झाला आहे.
याचा अर्थ मेष राशीचे गुण मीन राशीने घेतले असा होत नाही तर आज जो मेष राशीचा काळ एप्रिल-मे हा आहे तो २० हजार वर्षांनी नोव्हेंबर-डिसेंबर होणार आहे म्हणजे त्यावेळेस या काळात जे लोक जन्माला येतील त्यांची रास हि मेष असणार आहे.
पाश्चिमात्य राशीचक्रात वसंतसंपात बिंदूचा स्थानबद्दल लक्षात घेत नाहीत. त्यामुळे राशींचा काळ बदलत नाही. तसेच पाश्चिमात्य राशिचक्रात चंद्र, राहू, केतू आणि इतर ग्रहांचा मनुष्यावरती काहीही परिणाम मानला जात नाही किंवा त्या लोकांनी ज्योतिषशास्त्रात या ग्रहांना काहीही महत्त्व दिलेले नाही.
पाश्चिमात्य खगोलतज्ञ म्हणतात कि आम्ही प्राचीन ईजिप्तच्या "सौर" कॅलेंडरलाच मानतो.तारकापुंज,मुहूर्त किंवा ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या स्थानाला ते लोक महत्त्व देत नाहीत कारण त्यांचा प्रमाणिकरणावरती(Standardization) जास्त भर आहे. याच कारणामुळे मेष हि राशी त्यांनी मार्च-एप्रिल या कालावधीत कायमस्वरूपी स्थिर केली आहे जेणेकरून मुहूर्तांमुळे येणार किचकट पणा येणार नाही आणि एक प्रमाणबद्धता कायम राहील.
Comments
Post a Comment