पहिल्या आणि शेवटच्या राशींचे ऐतिहासिक महत्व
मेष हि राशीचक्रातील प्रथम रास तर मीन हि शेवटची. साम्राज्य विस्तार करणारे अनेक महान राजे आणि योद्धे मेष या राशीत जन्माला आले. तर मीन या राशीत जन्माला आलेल्या काही मोजक्याच लोकांचे मानवी संस्कृतीच्या रक्षणासाठी फार मोठे योगदान आहे. मीन या राशीचा कालावधी १८ फेब्रुवारी ते २१ मार्च हा आहे.
मेष आणि मीन या परस्पर विरोधी स्वभावाच्या राशी आहेत. म्हणजे मेष हा ताठ स्वभावाचा असतो आणि थेट समोरून हल्ला करतो. तर मीन हा वरून दिसायला लवचिक असला तरी जबडा बघितल्यानंतर समजते कि किती धोकादायक आहे. तसेच सर्वात शेवटची रास या अर्थाने मीन राशीचे लोक हे सर्वात पाठीमागे राहून वेळ आल्यावरती डाव टाकायला प्रसिद्ध असतात.तसेच मीन राशीचे लोक स्वभावात लवचिकपणा असल्यामुळे कोणत्याही परिस्थिती मार्ग काढायला तयार असतात.
मीन आणि सिंह राशींची तुलना केली तर सिंह राशींचे बरेच महान राजे प्रचंड महत्वकांक्षी आणि जगाचे काहीतरी भले करायची इच्छा असूनही खालच्या कुटिल लोकांच्या कारस्थानांना बळी पडून कमी वयातच संपले परंतू मीन राशीच्या लोकांनी आपल्या समोर माफक ध्येय ठेऊन ते पूर्ण केलेच.
मीन आणि कोळी लोकांचा परस्परांशी संबंध आहे. अनेक महान ऋषी कोळी जमातीत जन्माला आले होते.
Comments
Post a Comment