तिथींची नोंद ठेवण्याचे फायदे काय आहेत?
आपले पारंपरिक कॅलेंडर हे चंद्राच्या भ्रमणावरती आधारित आहे आणि सुरुवातीला प्राचीन सभ्यतेत जे कॅलेंडर वापरायचे ते चंद्रावरती आधारित होते. नंतर प्राचीन ईजिप्तच्या लोकांनी जगात सर्वात प्रथम व्यावहारिक कारणांसाठी ३६५ दिवसांचे सौर कॅलेंडर बनविले. मुस्लिम कॅलेंडर सुद्धा चंद्राच्या गतीवरती आधारित आहे.
आपली संस्कृति,प्राचीन घटना आणि रूढीपरंपरा या आठवणींच्या स्वरूपात जतनं रहाव्यात हे तिथींची नोंद ठेवण्याचे प्रमुख कारण आहे.
तारिख ही दिवसातील प्रत्येक घटिकांची ज्योतिषशास्त्रीय दृष्टया नोंद सांगू शकत नाही.तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टया महिन्याच्या प्रत्येक तारखेचे महत्त्व सौर कॅलेंडर सांगू शकत नाही. एकाच महिन्यात जन्मलेल्या बालकांची सूर्य रास हि एकच असली तरी आणि त्यांचे बऱ्याच अंशी स्वभाव जुळत असले तरी प्रत्येक तारखेनुसार आणि दिवसातील प्रत्येक घटिकेनुसार बालकांची चंद्ररास आणि ग्रहमान बदलते.
आपल्या जन्माची वेळ ब्राह्मणाला सांगितली आणि तो ब्राह्मण खरोखर तज्ञ असेल तर तो अगदी लहानपणीच आपला स्वभाव आणि जन्मजात मिळालेली आपली प्रतिभा ओळखून या बालकाची आवड नक्की कशात आहे आणि त्याला त्याप्रमाणे कसे घडविले पाहिजे हे सांगू शकतो.त्या बालकाचा स्वभाव कसा असेल आणि त्याला कशी वागणूक दिली पाहिजे हेही सांगू शकतो.
परंतू ग्रहदशा ,ग्रहशांती आणि मरणाचे भाकित यावरती मी मुळीच विश्वास ठेवत नाही. तसेच मुहूर्त पाहून कोणतेही काम करणे यावरतीही मी विश्वास ठेवत नाही.
Comments
Post a Comment