पशुपालनचा व्यवसाय सबंध जगातील मानव जातीची प्राथमिक अवस्था मानला जातो.

* पशुपालनचा व्यवसाय सबंध जगातील मानव जातीची प्राथमिक अवस्था मानला जातो. याच पशुपालन अवस्थेत लिपी, भाषांचा उगम झालेला आढळून येतो आणि अनेक जमातींचे, प्रदेशांचे आणि इतर अनेक गोष्टींचे नामकरण हि झाल्याचे पुरावे मिळतात. पशुपालक जमातींना आदिम जाती व टोळ्या, वन्यजमाती व गिरिजन अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यांपैकी ‘धनगर’ हे नाव राष्ट्रीय परिभाषेत अधिक प्रचलित आहे. 
* माझ्या अभ्यासानुसार 'धनगर' हा जनसमूह अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या पशुपालक जमातींच्या समूहाचा एक संघ आहे. जसे 'भारत' देश हा अनेक राज्यांचा संघ आहे तसाच 'धनगर' हा अनेक जमातींचा संघ आहे असे म्हणता येईल. या सर्व पशुपालक जमातींमध्ये मूळ एकाच कुळ/टोळीचे लोक पसरलेले आहेत. वर्णव्यवस्था हि यातीलच काही लोकांनी मिळून कालांतराने निर्माण केलेली समाजव्यवस्था होय. पण काही लोक पूर्वीपासून आजही मूळ पशुपालन व्यवसायाला चिकटून आहेत. कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी.. म्हणजेच सर्व प्रकारचे व्यवसाय या समाजातील लोक पूर्वीपासून करीत आले आहेत. संपूर्ण भारतात 'धनगर' या नावाने जरी पशुपालक लोकांची ओळख असली तरी त्यातील अनेक जमाती आणि त्यांच्या जाती/पोटजातींची संख्या प्रचंड आहे. आणि विशेष म्हणजे त्यातील प्रत्येकाची स्वतःची ओळख, इतिहास आणि संस्कृती आहे. या सर्वाला सर्वसमावेशकपणे 'धनगर' असेच म्हटलं जाते

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).