500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले

500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले
इंग्रज पुण्यावर चाल करून येत असल्याचे समजताच लढाईची परवानगी मागायला रायनाक, सिधनाक सारखे वीर शनिवारवाड्यावर गेले तेव्हा नाचगाण्यात दंग असलेल्या पेशव्यांचा रसभंग झाल्याने त्यांनी त्यांना पेशव्यांचे राज्य महार-मांगाच्या भरवशावर नाही म्हणून अपमानित करून हाकलून दिले आणि मग मात्र महारांचा स्फोट झाला. आतापर्यंत झेललेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महारांचे हात शिवशिवू लागले चाणाक्ष इंग्रजानी महारांना जवळ केले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत 1 जानेवारी 1818 रोजी 500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले गर्वान्ध पेशवे महारांपुढे चारी मुंड्या चीत झाले. महारांच्या अविस्मरणीय शौर्याची व पेशव्यांच्या नाचक्कीची इतिहासात नोंद झाली. पेशव्यांची उरली सुरली इभ्रत महारांनी सोलापूर व आष्टीच्या काढली आणि पेशवाई नेस्तनाबूत केली तेव्हा कुठे महार मांग जातीवरील अमानवीय छळाचा महारांच्या उरातील ज्वालामुखी शांत झाला.
बाबासाहेब म्हणायचे, " गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल"
( हा धर्मांतर पूर्विचा इतिहास आहे म्हणून महार शब्दाचे प्रयोजन आहे.)

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/746148638850887

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).