असा घडलो मी: शाळा, कोकणातले दिवस आणि प्रेमप्रकरण


कोकणात वृक्षवल्ली भरपूर असल्यामुळे कोकणातील वातावरण प्रेमप्रकरणासाठी अतिशय पोषक आहे. तसेच आपल्या सांगली,सातारा,पुणे आणि कोल्हापूरसारखे प्रेमप्रकरणांतून तिकडे राडेही होत नाहीत.परंतू सरांच्या मुलांनी अतिशय सभ्य राहावे अशी कोकणी लोकांची अपेक्षा असते बाकींनी काहीही केले तरी चालते. माझे वडील शिक्षक आणि त्यात "हिटलर". कदाचित हिटलर आणि आमचे पूर्वज एकच असावेत.माझे आजोबा तर "चंगेज खान" वाटावे असेच होते. परंतू मी मात्र राम, कृष्णा किंवा गौतम बुद्धांना सारखा वागायला आणि दिसायला सौम्य परंतू प्रसंगी अतिशय क्रूर आहे. माझी एखाद्यावरती नजर पडली तर काही वर्षात त्या माणसाचे काम तमाम होते हा माझा अनुभव आहे.
कोकणात आमच्या शाळेत माझे नातेवाईक शिक्षक होते तेही अतिशय कडक. त्यांची शाळेत अतिशय कडक शिक्षक म्हणून प्रतिमा होती. या सर्वांचे माझ्यावरती विशेष लक्ष.कसा बसा घाबरत घाबरत जगायचो मी.त्यात मी मुलींशी बोेलायलाही फारच घाबरायचो.त्यामुळे ही प्रेमप्रकरणे फक्त बघत बसण्यापेक्षा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बरं आम्ही थोडं मनमोकळं वागायला सुरुवात केली तर कोकणातील मुल म्हणायची बाई.... ,सरांचा मुलगा ना रे तू.... ,असा काय तू.....? अर मेलास तो आता कामतन गेला..
माझे लहानपणापासून सर्वात जास्त माझ्या आईच्या वडिलांवरती प्रेम. अगदी राजासारखा हुशार आणि विद्वान माणूस परंतू सध्याच्या भारतात विद्वातेला फार महत्त्व नाही आहे. माझे आईचे वडील दिसायला अगदी शक क्षत्रप रुद्रदामन सारखेच आहेत. रुद्रदामन हे अतिशय विद्वान आणि प्रेमळ शक क्षत्रप होते. त्यामुळे रुद्रदामन माझ्या विशेष आवडीचे.
नंतर मी ठरविले कि आता घाबरट होऊन चालणार नाही. थोडे धूर्त आणि क्रूर बनूया कारण धूर्त लोकांना मुलींचा सहवास फार लाभतो.चंगेज खान या क्रूर माणसाला आणि सध्याचा दाऊद आणि नेते मंडळींसारख्या धूर्त लोकांना महिलेंचा सहवास फार लाभतो.
परंतू नंतर विचार केला कि आपले पुर्वज राम,कृष्ण,गौतम बुद्ध आणि रुद्रादामन सारखे प्रेमळ होते म्हणून याच लोकांनी सगळे जग सुधरवले आहे.आपण मारवाडी किंवा इतर कोणासारखे अतिशय धुर्त किंवा इतिहासातील क्रुर लोकांप्रमाणे वागुन कसे चालेल?
अर्थात धुर्त लोकांसमवेत धुर्तच वागले पाहिजे या मताचा मी आहे.






Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).