सध्याची कुटिलता काहीच नाही
प्राचीन राजकारणाच्या तुलनेत सध्याचे राजकारण अगदीच पोरखळ आहे. अलेक्सझांडर सारख्या विश्वविजेत्याला एका गुलाम आणि नपुंसक माणसाने संपविले. आलेक्सझांडर आजारी पडल्यानंतर एका महिन्यात संपला होता हा इतिहास आहे.त्याच्यावरती रोज थोडा थोडा विषप्रयोग झाला होता.
पर्शियन शासक निष्क्रिय झाले होते म्हणून आणि अलेक्सझांडरचा संभाव्य धोका ओळखून त्याने पर्शियन राजघराणयातील ९ सदस्यांना संपवून तो पर्शिया सारख्या तत्कालीन जगतात बलाढ्य असणाऱ्या साम्राज्याचा एकहाती शासक झाला होता. आणि दारा द्वितीय ने त्याच्यावरती टाकलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखविला.
नंतर त्याने मध्य-आशियातील अनेक भटक्या जमातींना एकत्र करून पर्शियाच्या पूर्वेचा म्हणजे सिंध पर्यंतचा भाग काबीज केला होता. यांनतर काही शतकातच पूर्वेला मौर्यांनी सत्ता स्थापन करून ग्रीकांना सिंध प्रातांतातून पार पश्चिमेला हाकलून दिले.
मलिक अंबर या अश्याच आफ्रिकन गुलामाने शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. भलेभले अमात्य हि त्याच्यापुढे अगदीच नगण्य वाटतील अशी त्याची कामगिरी होती.
Comments
Post a Comment