पौराणिक कथांचे वास्तव:
सध्याचे जे आपले देव आहेत ते मुळात युद्धात हरले होते.अगदी अलीकडे(पुराणकाळात) जेव्हा शैव लोकांच्या म्हणजे वैदिक काळात वैदिकांकडून हरलेल्या लोकांच्या हाती या देशाची सत्ता आली तेव्हा रुद्र आणि पशुपतीला शिवा आणि प्रजापति असे मोठे स्वरूप दिले गेले आहे. पुराण लिहिण्याच्या म्हणजे मौर्य काळापासून शैव लोकांनी आपण विजेते होतो आणि वैदिक हरले होते हे पुराणांत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
राम ,कृष्ण आणि विश्वामित्र हे राजे आणि ऋषि सुद्धा वैदिक लोकांच्या इंद्राविरुद्ध हरले होते.
दक्ष-यज्ञात शिवाचा म्हणजे तिच्या पतीचा अपमान झाल्यामुळे दक्ष प्रजापतींची मुलगी सतीने यज्ञात उडी घेतली असे पुराणांत लिहिले आहे. परंतू नंतर हि कथा विधवा स्त्रीयांवरील बंधने कडक करून त्यांना सती देण्यासाठी निर्माण केली आहे. ऋग्वेदात हि कथा वेगळी आहे. ऋग्वेदात रुद्रदेव हा पुषाण देवाविरुद्ध हरला होता असा संदर्भ आहे परंतू सतीचा कुठेही उल्लेख नाही आहे.
"दक्ष-यज्ञ"
वैदिक लोकांनी "दक्ष-यज्ञ" केला होता परंतू त्यात रुद्रदेवाला बोलाविले नाही. तरीपण रुद्रदेव तिथे आला. रुद्रदेव मुळात फार रागिष्ट होता. त्याने रागाने "यज्ञ-बळीला" बाण मारला आणि तो बळीला खाणार इतक्यात पुषाण देवाने रुद्रदेवाचे दात तोडले आणि त्याला तेथून हाकलून लावले.
वैदिक लोकांनी "दक्ष-यज्ञ" केला होता परंतू त्यात रुद्रदेवाला बोलाविले नाही. तरीपण रुद्रदेव तिथे आला. रुद्रदेव मुळात फार रागिष्ट होता. त्याने रागाने "यज्ञ-बळीला" बाण मारला आणि तो बळीला खाणार इतक्यात पुषाण देवाने रुद्रदेवाचे दात तोडले आणि त्याला तेथून हाकलून लावले.
परंतू पुराणात सांगितले जाते कि शिवाने दक्ष-प्रजापतिला युद्धात हरवून त्याचे डोके उडविले आणि नंतर त्याला बोकडाचे डोके लावले.
पुषाण हि देवता वैदिक लोकांच्या बारा आदित्यांपैकी एक म्हणजे वैदिक लोकांची महत्त्वाची "सुर्य देवता" होती आणि हि देवता भटक्या मेंढपाळ लोकांसाठी अतिशय खास अशी होती.
मुळात शिवा हि संकल्पना फार मोठी आहे परंतू सध्या रुद्र चा संबंध शिवाशी जोडला जातो आहे.
रुद्र हि योद्धयांची देवता होती.प्राचीन शक क्षत्रपांनी रुद्र नावाचा आदर म्हणून सर्वात पहिल्यांदा रुद्रदामन आणि रुद्रसिंह हि नावे धारण केली होती.
Comments
Post a Comment