प्राचीन ऋषी-मुनी/प्रेषित आणि त्यांचे योगदान
युरोप,चीन,जपान आणि कोरिया या प्रमुख खंडात आणि देशांत ऋषी मुनीच नसल्यामुळे या ठिकाणी धर्मांचा उदय झाला नाही.भटके जीवन हे अध्यात्म शिकण्यासाठी जास्त पोषक असते. परंतू चीनसारख्या देशात शतकानोशतके स्थिरता असल्यामुळे याठिकाणी धर्माचा विकासच नाही झाला.
हे ऋषी-मुनी निसर्गाच्या सानिध्यात अधिक काळ व्यतित करित .निसर्गातील बारीक-सारिका घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करित .यातून त्यांना अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा शोध लागला. तसेच हजारो वर्षानुवर्षे योगाचे ज्ञान जतन करण्याचे कामही ऋषी-मुनींनी केले आहे.
ह्या ऋषी-मुनींचे इतर नातेवाईक जरी शहरी सभ्यतेत राजेशाही जीवन जगत असले तरी ह्यांचे मन शहरी सभ्यतेत रमत नसे. हे लोक शहरापासून दूर डोंगराच्या कडेला मेंढपाळ करत किंवा झोपडी बांधून गोपालन करत असत. हे गंभीर चेहऱ्याचे व कडक शिस्तीचे असत.यांच्या घरातील आणि इतर लोक यांना आदराने "आबा" किंवा "अब्बा" म्हणत.ह्या ऋषींची काही मुले राजेही बनत.
प्राचीन नागरी सभ्यता ह्या परकीय आक्रमण किंवा नौसर्गिक प्रलयामुळॆ नष्ट व्हायच्या. शहरी सभ्यता नष्ट होऊन जमातीचे परत भटके जीवन सुरु झाले कि हे ऋषी जमातीची सूत्रे हातात घेत.हे ऋषी अनेक महिलांशी विवाह करत.संन्यास घेण्याची प्रथा अगदी अलीकडे विकसित झाली आहे.
वैदिक काळानंतर बरेच ऋषी हे कोळी जमातीतून वरती आले होते. कारण त्याकाळी समाजातील मोठा वर्ग हा असभ्य परंतू लढाऊ होता आणि अश्या असभ्य समाजाला सभ्य समाजाने वरती येण्याची संधी दिली होती,त्यांना सभ्यता शिकविली होती.
पश्चिमेत यहुदी काळाची सुरुवात आणि भारतात वैदिक काळची सुरुवात एकाच वेळेस सुरु होणे हा निव्वळ योगायोग नाही आहे.या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे. ऋग्वेदात ज्या "पणि" लोकांचा उल्लेख आहे ते लोक यहुदी काळात पश्चिम आशियात राहत होते.
Comments
Post a Comment