पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता.

पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता. हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे आहे.
प्रत्येक समाजाला उन्नती आणि अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते. आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे मल्हारराव, यशवंतराव वा लोकमाता अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय.
याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत.
मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय?
आता तरी जागे व्हाल?

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).