हॉकीचे किमयागार आणि जगजेत्ता खेळाडू दादा किसनलाल यांना सलाम >>>>
खरच इतिहास हा पूर्ण खरा आणि प्रामाणिक असेल यात आत्ता काहीच शंका नाही कारण तो लिहिणारा कोणाला हिरो बनवू इच्छितो यावर सारे अवलंबून आहे ....
आत्ता हाच घ्या न इतिहास जो आम्हाला अभिमान वाटणारा जरूर आहेच पण तो आम्हाला अजिबात माहित नाही ....
१९४८ मध्ये इंग्लंड मध्ये हॉकीचे सामने झाले होते त्यावेळी भारतीय हॉकी संघाचे कप्तान होते दादा किसनलाल (दादा किसनलाल - हे २ फेब्रुवारी १९१७ मध्ये एका गरीब धनगर कुटुंबात जन्मलेले होते ) यांची निवड झाली आणि ती त्यांनी सार्थ करून दाखवली. कारण याचे अगोदरचे हॉकी संघ हे पूर्ण भारतीय नसत (१९३६ मध्ये मेजर ध्यानचंद यांनी बर्लिन येथे १२ गोल करून महापराक्रम केला त्यावेळी भारतीय टीम पूर्ण भारतीय नसत ) त्यामध्ये भारतीय आणि इंग्लंड यांचे काही लोक असत . (१९४७ पूर्वीची परिस्थिती) पण हा संघ मात्र पूर्ण भारतीय होता ज्याचे कप्तान दादा किसनलाल होते ,ते हॉकी विलक्षण खेळत असत.
या ओलोम्पिक स्पर्धेत भारतीय संघाला एकूण ५ सामने खेळावे लागले या मध्ये भारताने त्यावेळे ऑस्ट्रेलिया ला ८-० ने , हॉलंड २ - १ , अर्जेन्टिना ९ - १ , स्पेन - २ - १ गोलने पराभूत करून भारत अंतिम फेरीत दाखल झाला होता . भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना इंग्रजांच्या भूमीवर हि महापाक्रमी गोष्ठ आहे आणि ती करून दाखवली ती एका मेंढपाळाच्या (धनगराच्या ) पोराने म्हणजे दादा किसनलाल यांनी.
याच संघाला इंग्लंडच्या बादशाह किंग जॉर्ज याने खास भोजन दिले आणि त्यावेळचे भारतीय राजदूत व्ही. के. कृष्णमेनन यांनी संघाचे स्वागत केले.तसेच विजयी संघ भारतात आला त्यावेळी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांनी संघाचे जंगी स्वागत केले होते.जगातील अनेक राष्ट्रांनी दादा किसनलाल यांच्या हॉकी संघाचे आदराने आमंत्रण दिले होते आणि यथोचित सत्कार केले होते. स्वातंत्र्यकाळातील आपली खरी टीम आणि तिचा दिलेर कप्तान ज्याने हॉकी मध्ये आपले नाव अजरामर केले त्या दादा किसनलाल यांचा जगाने गौरव केला मात्र भारतात या धनगर पुत्राची जातीय विषमतेमुळे उपेक्षाच राहिली आणि इतिहासाने पुन्हा दाखवले कि लिहानारांचाच इतिहास.....गुणवत्तेला न्याय देत नसल्यामुळे आणि गुणवत्तेचा सन्मान करण्याचा परंपरा देशात नसल्याने येथील हॉकीची माती झाली आणि अनेक क्षेत्रात पिचे हाट झाली तरी आम्ही धडे घेताना दिसत नाही .....म्हणून आम्हाला चांगले कार्य केलेल्या सर्व व्यक्तींना आदर्श म्हणून समोर ठेवले पाहिजे आणि ज्यांनी कर्तुत्व दाखवले आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि इतिहासात स्थान देवून त्यांचा गौरव केला पाहिजे (कर्तुत्वाला जातीच्या चौकटीत बांधू नये , कर्तुत्वाचा योग्य सन्मान व्हावा ) तरच गुणवत्ता निर्माण होयील अन्यथा पुन्हा क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही ....सर्व जनता त्यांनी विसरली परंतु त्यांचे वारसदार म्हणवणारे सुद्धा त्यांना विसरले याचाही खेद होतो ....
( सौजन्य- डॉ.श्याम येडेकर ,कोल्हापूर यांचे समग्र साहित्य)
( सौजन्य- डॉ.श्याम येडेकर ,कोल्हापूर यांचे समग्र साहित्य)
दादा किसनलाल यांचे खेळास आणि कार्यास त्रिवार अभिवादन ...( हा त्यांचा फोटो ,जो गुगल वर उपलब्ध आहे)
Comments
Post a Comment