'ब्राह्मणांनाच शिव्या का ?'
(आवडले म्हणून, मिळाले तसे पाठवले)
(आवडले म्हणून, मिळाले तसे पाठवले)
एका जुन्या जाणत्या मराठा व्यक्तीचे ब्राह्मणांविषयीचे स्पष्ट विचार. खालील लेख दैनिक हिंदुस्थान, अमरावती मध्ये सोमवार दिनांक २५.०५.२००९ (पृष्ठ ११) या दिवशी,
"ब्राह्मणांनाच शिव्या का"
या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता. लेख लिहिणा-या व्यक्तीचे नाव आहे - श्री. साहेबराव घोगरे, माजी सचिव - अमरावती जिल्हा व मराठा महासंघ, अमरावती. (लेखक मराठा असून त्यांचे वय पासष्टीच्या पुढचे आहे (६५+),
म्हणजेच कदाचित हा लेख वाचणा-या सर्वांपेक्षा त्यांनी चार पावसाळे जास्त पाहीले आहेत, तेव्हा ब्रिगेडी लोकांनी ऊगाचच त्रागा करून त्यांना शिवीगाळ करू नये, कारण आपल्या सर्वांपेक्षा विचारांनी आणि वयाने ते जेष्ठ आहेत.)
"ब्राह्मणांनाच शिव्या का
?"
He khare ahe ki jante ajante panatun brahmanani ya deshat
varnavyavstha nirman keli.Samajat jati-potjatiche nirman zhale ani samajat
aikya rahile nahi.Bahujan samaj varhnuvarshe shikshanapasun vanchit rahila.Mul
Dhangar Assal itihasache vaidikikaran zhale ani dhangar itihas itihasatun gayab
zhala.Ase asle tari brahmnanche yogdan nakarata yet nahi.Brahmnanche yogdan ani
gun-vaishiste ya varati taklela ha prakashzot.
आजकाल काही विशिष्ट समाजाची, संघटनांची, साहित्य परिषदेची, साहित्य संमेलनांची सुरुवात ब्राह्मण समाजावर टीका करूनच नव्हे तर त्यांना शिव्या देऊन होते. या अशा लोकांची ब्राह्मणांना शिव्या देण्याची जणू काही फॅशन
(Fashion) झाली आहे. हि अत्यंत दुर्दैवी बाब तर आहेच शिवाय घृणास्पद कृत्यही आहे. फुटीचे विषय पसरविणारे काही विशिष्ट पुढारी या महाराष्ट्रात व देशात हि द्वेषपेरणी सतत करीत असतात. ब्राह्मणांनी दलितांना त्रास दिला, त्यांनी मराठ्यांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून टाकला वगैरे नेहेमीचे ताशेरे देणेच सुरूच असते. आमचा मराठा समाज तर आजकाल याचे भांडवल करत असतो. मराठा समाजाला ब्राह्मण समाजापासून काही त्रास झाला हि गोष्ट मी माझ्या सदुसष्ट (६७) वर्षांच्या काळात पहिली नाही.
शिवाजी महाराजांच्याजवळ कोणताही जातीभेद, धर्मभेद नव्हता हि गोष्ट सर्वश्रूत आहे. त्यांचे दरबारी ब्राह्मणांचे विशिष्ट स्थान होते, आदर होता. आज ब्राह्मणविरोधी लोक त्यांना बदनाम करण्यासाठी इतिहास बदलू पाहत आहेत. जेथे ब्राह्मणांच नाव आलं तो इतिहास खोटा अशी भ्रामक कल्पना जनतेमध्ये निर्माण करीत आहेत. ब्राह्मण इतिहासकारांकडून कदाचित एखादी चूक झाली असेलही त्याचा एवढा बाऊ कशाला? त्यापेक्षा या देशातील देवदेवतांच्या मूर्ती, देवळं, मूल्यवान शिल्प याची कोणी तोडफोड केली, कोहिनूर हिरा कोण घेऊन पळाला याची चर्चा का होत नाही ?
आजच्या मराठी साहित्यिकांनी तर प्राचीन व दर्जेदार साहित्यावर टिकेच झोड उठवून उच्छाद मांडला आहे. साहित्य हि मनाला आनंद देणारी कलाकृती असते. त्याची विशिष्ट भाषाशैली असते. ती मनाला विलक्षण सुखावून सोडते. पण ते साहित्य आजच्या लेखकांना नको आहे. केवळ उपाशी पोट आणि दलित हे दोनच शब्द त्यांच्या साहित्याची देन आहे.
आजच्या मराठी साहित्यिकांनी तर प्राचीन व दर्जेदार साहित्यावर टिकेच झोड उठवून उच्छाद मांडला आहे. साहित्य हि मनाला आनंद देणारी कलाकृती असते. त्याची विशिष्ट भाषाशैली असते. ती मनाला विलक्षण सुखावून सोडते. पण ते साहित्य आजच्या लेखकांना नको आहे. केवळ उपाशी पोट आणि दलित हे दोनच शब्द त्यांच्या साहित्याची देन आहे.
आज या लोकांना सावरकर, पु.ल., कुसुमाग्रज, करंदीकर, खांडेकर आठवत नाहीत. त्यांची प्रतिभाही कळत नाही. आज उपाशी पोटाचा आणि काही विशिष्ट जमातीवर कथित अत्याचाराचा खोटा डंका वाजवणारे नवलेखक जन्माला येत आहेत.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांचेवर अनेक टीकाकारांची झोड असते. त्यांचे मतानुसार एकवेळ दादोजी आणि रामदास महाराजांचे गुरु नसले तरी दादोजींनी काही कोणावर अत्याचार केले नाहीत. कुणाला दगाफटकाहि केला नाही. रामदासाचा दासबोध पचविण्याचे सामर्थ्य आजच्या अनेकात नाही. त्यामुळे ते तसे बोलणारच.
या उलट महाराजांना दगाफटका करणारा अफझलखान, दोनदा जीवदान दिल्यानंतरही पृथ्वीराज चव्हाणास धोका करून मारणारा महंमद घोरी मात्र यांना आठवत नाही. स्वातंत्र्याचा संग्राम असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो, ब्राह्मण पुढारीच यात अग्रेसर होते. नुसते अग्रेसर नाही तर त्यांनी काळेपाणी भोगले, ते फासावर गेले. टिळक, सावरकरांच्या त्यागाला तर सीमा नाही. कलेक्टर जॅक्सन
(Jackson) ची हत्या करून सतराव्या वर्षी फाशीवर जाणारा अनंत कान्हेरे, कर्नल रँड (Rand) ची हत्या करणारे चाफेकर बंधूही हसत हसत फासावर लटकले. कोण होते ते ? संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणपणाने लढणारे सेनापती बापट, नानासाहेब गोरे, एस.एम., आचार्य अत्रे, दंडवते, अहिल्या रांगणेकर, गोदावरी परुळेकर आणि असंख्य ब्राह्मणच होते. दिग्गज कामगार नेते, दिग्गज साहित्यिक, दिग्गज पत्रकार, वक्ता दशसहस्त्रेषु सारखे शेवाळकर कोण होते व आहेत? पण यासारख्या देशभक्त व देशाची संस्कृती जपणा-या लोकांवरच टीका होते हे बरे नाही. ब्राह्मणांमध्ये एकाच दोष असला तर हाच कि ते आपल्या समाजात अधिक मिसळतात. गुणांची मात्र ते खाण आहेत, त्यांच्यापासून कोणालाही तोटा नाही.
१) ब्राह्मणाला कितीही शिव्या घाला, तुमच्यावर अट्रोसिटी
(Atrocity) दाखल होत नाही.
२) त्यांच्यामुळे कुणाच्याही शिक्षणातील, नोकरीतील रिझर्वेशनवर परिणाम होत नाही.
३) ब्राह्मण कुटुंबात स्त्रियांच्यावर अत्याचार होत नाहीत. त्यांच्या बायका जाळून मरत नाहीत. घटस्फोट होत नाहीत.
४) ते देशी दारू पिवून धिंगाणा घालत नाहीत.
५) चोरी, दरोडा, हत्या, लुटमार, चेन स्नाचिंग (Chain Snatching), मारपीट यामध्ये जोशी, कुलकर्णी, देशपांडे यांची नावे नसतात.
६) बोलण्यात सभ्यता व सुसंस्कृतपणा आहे.
७) कार्यालयीन कामकाजात इतरांपेक्षा तरबेज आहेत. नियमांचे ज्ञान इतरांपेक्षा अधिक असून बर्याच प्रमाणात कामात प्रामाणिक आहेत. याचे एक जिवंत उदाहरण माझ्यासमोर आहे. आमचे क्लास वन अधिकारी खूप मराठा धार्जिणे होते. त्यांचा ब्राह्मण कर्मचा-यांवर राग असायचा. परंतु ते त्यांच्या मागे कबुल करायचे कि खरोखर ब्राह्मण कर्मचारीच कामाचे आहेत. त्यांना भरल्या ताटावरून हाक मारली तरी कार्यालयात धावत येतात. आपले पाटील, देशमुख उगीच ठसन दाखवतात. याची परीक्षाही त्यांनी बरेचदा घेतली. तेव्हाचे ब्राह्मण कर्मचारी कसोटीत पास झाले.
८) ते इतरांसारखे आक्रमक कधीच होत नाहीत.
९) त्यांच्या सभासंमेलनात त्यांच्या उन्नतीवर चर्चा होते. दुसरा काय बोलतो काय करतो याच्या भानगडीत ते सहसा पडत नाहीत.
१०) मराठा समाजासारखी एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असत नाही.
११) काटकसरीने व्यवस्थित कुटुंब चालवण्याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा.
१२) रसिकत्त्वाचे ते खरे धनी आहेत.
यानंतरही जर त्यांना आपण शिव्या देत असू तर त्याला करंटेपणच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य आहे असे म्हणतात. मुख्यमंत्रीही येथे मराठा समाजाचेच जास्त झाले. परंतु शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या येथे मागे राहिला तो मराठा समाजच. तथाकथित मराठा नेते मात्र आपल्या सोयीनुसार मराठा शब्दाचा अर्थ मराठी माणूस असा घेतात. परंतु जेव्हा आपल्या समाजाची उन्नती करायची असते तेव्हा, जातीची तरफदारी केलीच पाहिजे. त्यात वावगं काहीच नाही.
साभार - साहेबराव घोगरे, माजी सचिव - अमरावती जिल्हा व मराठा महासंघ, अमरावती. दैनिक हिंदुस्थान, अमरावती, दिनांक २५.०५.२००९ (पृष्ठ ११
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/636790013120084
Comments
Post a Comment