अतिप्राचीन हट्टी-धनगर जमात
यज्ञ- होतार म्हणजे वैदिक काळात यज्ञाच्या वेळेस पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा जो जनसमूह होता. जो मंत्रांचे उच्चारण करून देवतांचे आवाहन करतो. त्यांना होतार, होता म्हटले जात असे. काही ठिकाणी अग्नीला सुद्धा 'होता' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे याच अग्नी देवतेचे वाहन 'मेंढा' आहे. (अजून सुद्धा भारतातील अनेक पशुपालक जनसमूह संध्येच्या वेळेस अग्नी पेटवून त्याच्याकडेला त्यांची (गजी ढोल) वाद्ये वाजवून देवाची स्तुती सुमने गातात, म्हणजेच ओव्या गायल्या जातात. नक्कीच या सर्व गोष्टींचा संबंध वैदिक काळाशी असला पाहिजे असे मला वाटते.हि परंपरा सध्या महाराष्ट्रातील हटकर लोकांनी जपली आहे.)
मेषपालक आणि अग्नी यांचा नक्कीच काहीतरी घनिष्ट संबंध असावा असे मला वाटते, कारण ज्या वैदिक मंत्रांमध्ये ज्याचे महत्वाचे स्थान आहे अशी अग्नी देवता तिचे वाहनच मेंढा आहे.
ऋग्वेदातील प्रथम मंडलातील प्रथम सुक्तामधील पहिलीच ऋचा अशी आहे.
अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
भावार्थ- अग्नी हा यज्ञाचा अग्रणी आहे. यज्ञाचा प्रमुख देव तोच. यज्ञाचे हविर्भाग त्या त्या देवतांप्रत पोहोंचविणारा सन्मानमीय आचार्यही तोच. रत्नांचा अनुपम निधि ह्याचे जवळ आहे. तेव्हां अशा अग्निदेवाचें मी भक्तिपुरःसर स्तवन करतो. ॥ १ ॥

जगामध्ये अनेक ठिकाणी हट्टी लोकांची राज्ये, साम्राज्ये होती असे शिलालेख, ग्रंथ यांवरून स्पष्ट झाले आहे.
माझा असा एक तर्क आहे कि, होता या शब्दापासून वैदिक कालानंतर हट्टी,हाटक हे शब्द अनुक्रमे पशुपालक जनसमूह, देश-शस्त्र, यांना पडले असावेत. ऋचेत 'प॒क्थे' आणि 'होतॄ॑न्' हे दोन शब्द येतात. सध्याच्या माहितीनुसार अनेक अभ्यासकांच्या मते अफगाणिस्तान मध्ये असलेली पश्तुन-पख्तून हे पशुपालक जनसमूह वैदिक काळापासून तिथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे 'होतार' या शब्दापासून पुढे हाटक, हट्टी, हटकर हे शब्द तयार झाले असावेत.

बरगे- यांना बरगी धनगर, भाला घेऊन मेंढपाळ करणारे म्हणून हि ओळखले जाते. यावरून बर्गे,बारगळ अशी आडनावे आहेत. आजपासून २,६०० वर्षांपूर्वी 'कौटिल्य' म्हणजेच चाणक्य यांनी लिहिलेल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात 'भाला' या शस्त्राला कुंतल आणि तोमर या दोन नावांबरोबरच 'हाटक' म्हणून सुद्धा ओळखले जायचे असे उल्लेख सापडले आहेत. महाराष्ट्रातील बरगी- बरगी हा शब्द (मराठीतील बरचा/ भाला) यावरून आला आहे. थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर- होळकर यांचे मामा सुद्धा सरदार कदमबांडे यांच्याकडे बारगीर होते. त्या काळात हे सर्वच जण 'मराठा धनगर' म्हणून ओळखले जात असत. त्यानंतरच्या काळात यापैकी रघुजी कारंडे हे नागपूरकर भोसले यांचे विश्वासू सेनापती होते. बरगी जनसमूहाचे लोक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. मध्यप्रदेशातील हट्टी लोकांना बरगाही राजपूत असे नाव पडले आहे. त्यांची खूप मोठी लोकसंख्या तेथे राहत असून ते स्वतःला हटकर मानतात. बरगी शब्दापासूनच पुढे बारगीर असा शब्द तयार झाला.
'A British commentator, Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकार्याने मिळवलेल्या माहितीत त्याला अशी माहिती मिळाली कि, " बारा कुळीच्या लढाऊ मेंढपाळ करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजेच वाडी, बारा हट्टी असे म्हटले जात असत. हटकर हे खूप वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थातून दक्षिणेत आले आहेत, असे ते म्हणतात. ते सर्व हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊन मेंढपाळ करणारे लोक आहेत. अंदाजे जेव्हा निजाम दक्खनचा सुभेदार म्हणून नेमला गेला त्या वेळेस ते आले असावेत."
बंगाली लोक मराठा साम्राज्याच्या घोडेस्वारांना बोँरगी असे म्हणत.बोँरगी म्हणजेच बारगीर (घोडेस्वार).बंगाली भाषिकांचा इतिहास, सेनगुप्ता यांनी असे लिहिले आहे कि, "बर्गी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे, तसेच ते घोडेस्वार आणि शस्त्र घेऊन मराठा साम्राज्यात शिलेदार या पदावर असत."
'A British commentator, Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकार्याने मिळवलेल्या माहितीत त्याला अशी माहिती मिळाली कि, " बारा कुळीच्या लढाऊ मेंढपाळ करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजेच वाडी, बारा हट्टी असे म्हटले जात असत. हटकर हे खूप वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थातून दक्षिणेत आले आहेत, असे ते म्हणतात. ते सर्व हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊन मेंढपाळ करणारे लोक आहेत. अंदाजे जेव्हा निजाम दक्खनचा सुभेदार म्हणून नेमला गेला त्या वेळेस ते आले असावेत."
बंगाली लोक मराठा साम्राज्याच्या घोडेस्वारांना बोँरगी असे म्हणत.बोँरगी म्हणजेच बारगीर (घोडेस्वार).बंगाली भाषिकांचा इतिहास, सेनगुप्ता यांनी असे लिहिले आहे कि, "बर्गी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे, तसेच ते घोडेस्वार आणि शस्त्र घेऊन मराठा साम्राज्यात शिलेदार या पदावर असत."
जगामध्ये अनेक ठिकाणी हट्टी लोकांची राज्ये, साम्राज्ये होती असे शिलालेख, ग्रंथ यांवरून स्पष्ट झाले आहे.
* हट्टी लोकांच्या प्रशासन-लष्करातील पदव्या- चौधरी, चौघुला, पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे, महाराजा.
* हट्टी लोकांच्या धार्मिक पदव्या- पुजारी, गुरव, दडस, सिध्द, खंडोबाचे घर-वाघे, बिरोबाचे पुरोहित.
* होतार- हि ऋग्वेदकालीन धार्मिक पदवी हट्टी,हटकर लोकांना असावी असा माझा तर्क आहे, कारण 'होतार' लोक वैदिक काळी यज्ञाच्या वेळेस मंत्रोच्चारण करून देवतांचे आवाहन करीत आणि अग्नी देवतेचे वाहन मेंढा असून 'होता' असे नाव अग्नीला देखील दिले गेले आहे. हि परंपरा बऱ्याच प्रमाणात सध्याच्या गजी नृत्य, सिध्द परंपरा यांच्याशी मिळती जुळती आहे.

Comments
Post a Comment