Glorious History of Dhangars (धनगरांचा गौरवशाली इतिहास)

Glorious History of Dhangars (धनगरांचा गौरवशाली इतिहास)
काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय. 

निर्मिती ही बहुपेडी असते. संपत्ती, सत्ता, संस्क्रुती, कला, वास्तु अणि साहित्यातुन ती परिस्फुट होत असते. महाराष्ट्रातील आद्य वसाहतकार हे पशुपालक होते हे मे आधीच्या लेखांत स्पष्ट केले आहे. सावळदा संस्क्रुतीचे सर्वात पुरातन अवशेष आता तापी नदीच्या खो-यात सापडले आहेत आणि त्यांचा काळ हा इसपु ३००० इतका मागे जातो. या प्रदेशात सापडलेल्या अवशेशांवरुन या संस्क्रुतीचे निर्माते अहिर पशुपालक होते असे स्पष्ट होते. या प्रदेशातील भाषेला अहिराणी म्हणतात यावरुन यांची प्राचीनता लक्षात यावी. पशुपालन, मासेमारी, काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे. 

थोडक्यात हे लोक आजच्या धनगर समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. यामागोमाग पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.) 

म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय, जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे आहेत हे उघड आहे.

सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पश्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. उदा. प्राक्रुतात सातपुडा हा छात-छवत या नावाने ओळखला जात होता. सातवाहनांची मुल प्राक्रुत नावे छातवाहन...छातकरनी अशी आहेत. आद्य सम्राट सिमुखाचे खरे प्राक्रुत नाव छिमुक असे आहे. प्राक्रुत शब्दांचे संस्क्रुतीकरण करण्याच्या नादात मुळ अर्थ हरवण्याचा प्रकार घडला आहे. (पहा: महाराष्ट्र ग्याझेटीयर...प्राचीन काळ-) थोदक्यात आजच्या सातपुड्याच्या, म्हणजेच खानदेशच्या भुमीतुन हा राजवंश पुढे आला. सातपुडा परिसरातुन आले म्हणुन सातवाहन...याचा संस्क्रुत अर्थ नाही कारण तो प्राक्रुत भाशेतील आहे, पण अनेक विद्वान हा शब्द संस्क्रुतातुन आला असावा असे समजुन अर्थ काढत बसले म्हणुन मोठी फसगत झाली आहे. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात नाही. स्वतंत्र राज्यस्थापनेपुर्वी हे चंद्रगुप्त मौर्याचे सामंत होते. चंद्रगुप्त मौर्य हा मोरीय या पशुपालक समाजातुनच पुढे येत सम्राट बनला होता हा इतिहास आता स्पष्ट झाला आहे. यावरुन दोन्ही समाजांचे पुरातन नाते स्पष्ट होते. 
एवढेच नव्हे तर हाल सादवाहनाने गाथा सप्तसही च्या रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा आपल्यासाठी निर्माण केला होता हे कसे विसरता येईल? सादवाहनांनी विदेशी व्यापार वाढवला होता. त्यांचे नौकाशास्त्र एवढे प्रगत होते कि मेगास्थानिसनेही त्याचा आदरपुर्वक उल्लेख केला आहे. 

पुढे वाकाटक, कदंब, राष्ट्रकूट , यादव, भोज हे महाराष्ट्रातील राज्यकर्तेही याच विस्त्रुत समाजातुन उदयाला आले. याचे कारण म्हणजे, हा पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता. हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे आहे.

कुंतलचे राष्ट्रकूट (Origin Man region of present Satara District) :Rulers- Hatkar Dhangars (Kshahrat/Kharat/Mane/Shendge/Bandgar/Hake/Madane/Barge/Bargal etc..) also known as Mara-Hatta or Maratha
हटकर धनगरांचा "खरात" (क्षहरात) राजवंश: नहपान क्षहरात त्याचें घराणें:
गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवून सातवाहन साम्राज्याचे गतवैभव परत प्राप्त केले आणि मराठी भाषेस सुवर्णकाळ प्राप्त केला .
नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " खखरात (क्षहरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"
क्षत्रियांचा (क्षहरात) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
नहपानाचे काही वंशज दक्षिण भारतात गेले. त्यांपैकी मान राजाचे नाव पुराणात येते. त्याची क्षहरातांची विशिष्ट चिन्हे असलेली नाणी माहिषक प्रदेशात (आंध्र प्रदेश) सापडली आहेत. पुढे कर्नाटकात शकसत्तेचा विस्तार होऊन त्यायोगे शक संवताचा दक्षिणेत प्रसार झाला, असे दिसते.
सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत.

मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासाने कुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही; पण त्यातील काही उतारे राजशेखर भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. 

दुसरे राष्ट्रकूट घराणे (Origin:Vidharbha):Rulers :Hatkar Dhangars (Rathod)
दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.

राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा वेरूळ येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली.

याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय? 

प्रत्येक समाजाला उन्नती आणि अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते. आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे मल्हारराव, यशवंतराव वा लोकमाता अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय. 

मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...

Ref:Mr.Sanjay Sonawani


Reserach about Rastrakuta Dynasty  by Vinaykumar V.Madane-Patil

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).