७/१२ शब्दाचा उगम :
साधारणपणे भारतामध्ये घराचा (Real Estate) व्यवहार करताना 'सात-बाराचा उतारा' आणावा लागतो. हे बहुश्रुत आहे. 'सात-बारा हे कुठल्याही कायद्याचे कलम नव्हे. हे अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील सात झाडे त्या गरीबाची आणि पाच झाडे सरकारची.
बारा झाडांची निगा राखून, सात झाडांची म्हणजे ७/१२, फळे स्वतः खावयाची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे, म्हणजे ५/१२ सरकारी जमा करावयाची, ती इतर गरिबांना वाटण्यासाठी.
त्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीच्या उताऱ्याला 'सात-बाराचा उतारा' म्हणण्याचा प्रघात पडला. तो आजतागायत चालू आहे.
Comments
Post a Comment