समाजबांधवांनो, इतिहासाला जागायचे म्हणजे नेमके काय करायचे?
--------------------------------------------
बंधंनो,ज्यांच्याकडे पूर्वजांच्या इतिहासाचा प्रचंड मोठा वारसा आहे ,त्या पिढ्यांनी वर्तमानकाळात मोठे राजकीय कर्तृत्व सिद्ध करून दाखविल्याची पुष्कळ उदाहरणे जगात सापडतात.भारतातही आहेत.या गोष्टीला अपवाद आहे तो भारतातील माझा धनगर समाज.आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा मेळ वर्तमानकाळाशी घालून नवा इतिहास निर्माण करता न येणारा धनगरसमाज हा जगातील एकमेव समाज असावा.प्रचंड मोठा इतिहास असलेला आपला समाज वर्तमानकाळात राजकीयदृष्ट्या बिथरलेला म्हणजे दिशाहीन असावा,ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.बंधूंनो,आपणच मारले भाले आणि मारल्या लढाया.आपणच लावले दिवे आणि फडकंविले झेंडे अटकेपार!आपल्याच स्ञीरत्नांनी लढल्या लढाया प्रत्यक्ष आणि इतिहाससाक्ष रणांगणावर!आपलीच जगातील राणी ती,जी सशस्ञ रणांगणी दाखल झालेली.आपल्याच राजवटींनी रचले इथे तत्वज्ञान समतेचे आणि जातीनिर्मुलनाचे.आपणच रचला पाया इथल्या कला-व्यापार-संस्कृती-धर्माच्या भरभराटीचा!'राज्य रयतेचे'हे ब्रिद आपल्याच राजवटींचे!आपल्याशिवाय कोणी रिता केला खाजगी खजीना रयतेसाठी?आपल्याच तलवारींनी आणि भाल्यांनी माजविले रण इथे!आपणच जिंकून घेतले आणि निर्मिले गड,किल्ले,बुरूज आणि स्वराज्याच्या नव्या सिमारेषाही!आपणच प्राणांतिक लढलो आणि भिडलो गो-यांशी,डचांशी,फरंग्यांशी आणि पोर्तुगिजांशी!आपणच मेलो ठार इथे इंचइंच भारतभूमीसाठी!आपणच मोडल्या वाटा विषमतेच्या ,अंधश्रद्धेच्या आणि नव्या वहीवाटा निर्माण केल्या श्रधांच्या! आपण जसे धर्माचे ,देवाचे देऊळ बांधले ,तसे तत्वाचेही!हजारो वर्षांच्या इथल्या इतिहासाची पाने चाळत गेलो तर,माझ्याच पूर्वजांच्या महापराक्रमाची निशाणी आणि खाणाखुणा आढळल्या मला सगळींकडे!या पानांवर कुठे विराजमान सातवहन,कुठे सम्राट अशोक तर आणखी कुठे होळकरशाहीतील शुरवीर,नरवीर!आपल्या इतिहासाची ही पाने इतकी अगणीत ,की आपल्याशिवाय कोण होते की नाही इथे,असा संभ्रम व्हावा!आपणच माजविले बंड भूमीसाठी आणि माडली ठाण सिमेवर,स्वराज्यरक्षणासाठी!
बंधुंनो, आपल्या इतिहासाला जागायचे म्हणजे नेमके काय करायचे? मी झिजवतो माझी पायतणे,माझी लेखणी आणि वाणी माझ्या इतिहासासाठी !जयमल्हार!
प्रा.विष्णू कावळे
'मल्हार',अंबाजोगाई,जि.बीड
९७६७७७९९००
९४२१३४८१४९
'मल्हार',अंबाजोगाई,जि.बीड
९७६७७७९९००
९४२१३४८१४९
Comments
Post a Comment