शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे ठलक मुद्दे

शिवाजीचे राज्य रयतेला आपलेसे वाटत होते. त्यांचे कार्य हे आपले आहे असे वाटत होते.
आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजीराजा जगला पाहीजे अशी त्यांची ठाम जिद्द व भूमिका होती. त्यांचे सहकारी व रयत त्यांच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होत.
त्याकाली सर्वच राजे लूटारू किंवा लूटारूंचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होती. म्हणून ते राजाराजांत फरक करीत नसत. म्हणून कोण राजा आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. शिवाजीचे कार्य सूरू झाले व एकदम बदल झाला. राजा व रयतेचा संबंध आला, त्यांची विचारपूस करू लागला.
उद्ध्वस्त गावे वसवली. शेतकर्यांना मदत केली. महसूल निश्चित केला.
वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था मोडून टाकली. रयतेस ग़ुलाम करणार्या देशमुख-देशपांडेचे वाडे कोट जमिनदोस्त केले.
स्त्रियांची इज़्ज़त क़ायम राहीले पाहीजे मग ती मुस्लिम वा हिंदू असो, अशा सक्त आज्ञा व अंमल.
राज्यकारभाराची प्राकृत भाषेत सुरू केला.
सैन्याने पिकाची नासाडी करता कामा नये, रयतेला त्रास होता कामा नये. सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता तर लूट थांबवणे हा होता.
महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बालगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, भंग करणार्यांना जबर बसेल अशा शिक्षा, सर्वात म्हत्वाचे म्हणजे अन्यायाचा व लूटींचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सूरू केलेले कार्य ह्यामूले सैन्यात फरक.
स्वदेशी मालाला संरक्षण तसेच शेती बरोबर व्यापार-उदिमांचीही कालजी. स्त्री पुरूषांची ग़ुलाम म्हणून खरेदी विक्रीस बंदी.
महाराजांचे अनेक मुसलमान सरदार तसेच मुसलमान राज्यकर्तांच्या पदरी अनेक हिंदू सरदार. शिवाजीराजांच्या मराठे व हिंदू विरूद्ध लढाया. मशिदींना दान व इनाम दिल्याच्या नोंदी. सैनिकांकरीता मशिदीस, कुराणास व स्त्रीस त्रास देता कामा नये असा सक्त नियम. ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा कोणी बखेडा करू नये असे फर्मावले.
जातीधर्मावर जूलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे. ईश्वर हा जगाचा, जातीधर्म त्यापाशी एकरंग.
शिवाजीराजे स्वतःस
'क्षत्रिय कुलवंतसं श्रीराजा शिवछत्रपती' म्हणवून घेत.
गाई, रयत व स्त्रिया यांना लूटण्यास बंदी.
ब्राह्मण म्हणून कोणी मुलाहिजा करू पहातो जे गनीम ते तसाच नतीजा पावणार असे बजावतात.
सर्व मराठे जसे महाराजांकडे नव्हते तसे सर्व ब्राह्मण ही नव्हते.
त्याकाली शिवाजी महाराजांना शूद्र समजणार्यांत फक्त ब्राह्मणच नव्हते. ९६ कुलीचे मराठे सरदारही त्यांना राजा म्हणून सुरूवातीस हक्क मानत नव्हते.
ते कोणत्या कुलांत जन्माला आले ह्या पेक्षा त्यांनी काय केले हे मह्त्वाचे. ज्यांच्या हातूनी काही घडत नाही ते कुलाची थोरवी गातात.
इतिहासाचा विपर्यास का?
रा.स्व. सं च्या पुण्याच्या पुढार्याने म. गांधींची ख़ून केला. ख़ून करून गांधी संपत नाहीत म्हणून स्वतःगांधीवादी बनून गांधींना संपवायला निघालेत.
महाराजांनासुध्दा ज्ञानेश्वर, तुकाराम, म.गांधी, सारखं विकृत करायच्या कार्यक्रम चालू आहे.
नविन वतने व वतनदार वाढताहेत. या वतनदार्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्यामूले जात आहेत. हे नवे वतनदार जास्त छलतात. साखरसम्राटाच्या विरूद्ध कोणी रयत गेला तर तो संपलाच. क़र्ज़ नाही, ख़त नाही,ऊस जात नाही, दोन वर्षात तो बरबाद होतो. रयतेच्या पोरीबालींवर ह्यांचा डोला आहे. महाराजांचे शिकवीण अंगी बाणून नव्या वतनदारांनावर प्रहार करणं हेच खर शिवरायांचे स्मरण करणे होय.
संयुक्त महाराष्ट्र झाला आणि आपण महाराज महाराष्टांत कोंडले
शिवसेना, हिंदू एकता, मराठा महासंघ, पतित पावन संघटनांनी महाराजांना कोंडले
-संकलन
अ़ॅड. अमित अ. कारंडे

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/617742575024828

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).