एक वेळ आवश्य भेट दया ! आपली संस्कृती ,परंपरा, देव चाली रीती, पोशाख ,दागदागिने हे आदिम जमाती प्रमाणेच आहेत . श्री .बिरोबा यात्रा आरेवाडी
---------------------------------
धनगर समाजाच कुलदैवत श्री बिरुदेव यात्रा आरेवाड़ी ता कवठे महांकाळ जि. सांगली येथे आज बुधवार दि.२५ मार्च २०१५ रोजी सुरु झाली .३५० एकर परिसरात हे बिरोबाच् बन आहे . या कडबनाच एकूण मोठ क्षेत्र आहे . मिरज - पंढरपुर असा रेल्वेमार्ग या बना जवळून गेला असून आवघ्य 2 की मी वर ढालगाव हे रेल्वे स्टेशन आहे तर बनाच्या पश्चिमेस मिरज -पंढरपुर राज्यमार्ग ही 3 की मी वरून गेला आहे .रेल्वे व रस्ता हे एकमेकाला समांतर जातात .येथील डोंगरावर जून मंदिर आहे . श्री बिरोबा मुख्य मंदिर बनामध्ये तीन गावच्या शिवेवर आहे .
या मंदिरात विठठल -बिरुदेव व गोपान्ना या तीन मूर्ती असून त्यांच्यावर एकच काम्बळा ( आडीच रेघी देवाची घोंगड़ी) पांघरला आहे या जागृत दैवताच दर्शन आवश्य घ्यावे
सत्य धर्मात महात्मा फुले यानी ज्याला निर्मिक म्हटल तो देव आपण नेहमीच मानतो . महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्य धर्माप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी देखील समाजात बंधुता रहावी यासाठी दलित बंधवाना निधर्मी न ठेवता या भूमितील बुद्ध धम्माचा स्विकार केला .
आम्ही धनगर सत्य ,प्रमाणिकपणा ,न्याय ,निति यालाच बिरोबा मानत आलो आहोत .जे जे सत्याच ,प्रामाणिकपणाच् न्यायाच ते ते आपल्या बिरुदेवाच असा सोपा आमचा भोळाभाव असतो . जे जे खोट ,अप्रामाणिकपणाच ते ते बिरोबाच नाही म्हणून ते ते धनगरांच पण नाही इतका सहज सोपा धनगरी विचार . जो धनगर खोट बोलतो तो धनगर नाहीच एवढं सत्याच, खरेपणाच धनगर समाजात महत्व आज ही आहे . सत युग गेल्यापासून जे बोलायच ते कधीच करायच नाही अस आता राजकारणात चालत त्यामुळे धनगर आजच्या राजकारणात मागे राहिला अस बोलल जात . या सतपणा पायी अनेक धनगरानी आपले संसार उधळून लावले पण सत्य सोडल नाही .आजही प्रमाणिकपणात धनगर समाजाचच उदाहरण सर्वत्र दिल जात .
धनगरांचे देव जसे बिरोबा धुलोबा सतोबा एकाई ,म्हाकाई ,भिवाई हे इतर समाजापेक्षा भिन्न तसे , सुम्बराण हे ओवीबद्ध भगवत स्मरण सामुहिक गजनृत्य ( याच आरेवाड़ीतील गजनृत्य संघ परदेशी लंडन पर्यंत जाऊन आला आहे)
,वालुग ,बोण ,आईच दूध , हेडाम ,भाकणुक (हुइक) , काम्बळा आशा अनेक धनगरी समृध्द परंपरा आहेत . त्या परंपरांचा आम्हाला सार्थ अभिमान हवा . धनगरी देवांचे पुजारी भगत हे धनगरच आसतात . इतर नागरी समाजाप्रमाणे ब्राम्हण पुजारी नसतात. धनगर समाजाची परंपरागत सिद्ध परंपरा प्राचीन व स्वतंत्र आहे .यातूनच धनगर ही आदिम भटकी आदिवासी जमात आहे हे सहज सिद्ध होते .याचा आज अखेर विस्तृत स्वतंत्र आभ्यास झालेला नाही
आरेवाडी ता.कवठे महांकाळ जि. सांगली येथील यात्रा आज आमच्या (येळावकर गावडे ) यांच्या मानाच्या गोडया नैवेद्याने सुरु होते आहे . पुरातन काळापासून या पहिल्या दिवसाला " येळावकरांच बोण " या नावाने ओळखल जाते .
आम्ही येळावीकर गावडे बंधू ( कोळेकर) हे आरेवाडीकर कोळेकर बंधूंचे ज्येष्ठ घर
हजारो वर्षापासून या तीर्थक्षेत्री आमच्या घराण्याकडे वंशपरागत आग्रपुजेचा मान आहे .
आमच्या भावकी घराणेच्या गोडा ( पूरणपोळी) चे नैवेद्याने आज यात्रा सुरु होते आहे .
दूसरे दिवशी म्हणजे उद्या समस्त धनगर समाज देवाला गोडा नैवेद्य देऊन येणारे नववर्षासाठी मनोकामना व्यक्त करत असतो .
तिसरे दिवशी आलेल्या समस्त पाहुणे मंडळी गेटावरील पोलिस लोक यांचे उपस्थितीत सूर्याबा सिद्ध ( नरोटे) याचेसाठी मांसाहारी भोजनाची व्यवस्था आम्हा येळावकर गावडे बंधूंच्या मानाचे बकरे देऊन केली जाते .
या यात्रेच्या निमित्ताने राज्यभरातील लाखोच्या संख्येने मेंढपाळ समाज पुढील नववर्षाचे संकल्प प्रत्यक्ष देवाचे साक्षीने शुभारंभ करणेचे ठरवत असतो .अनेक विवाह , मोठे निर्णय या यात्रेत पक्के करत आसतात .उपस्थित नातेवाईक मित्रमंडळीना या निमत्ताने गावोगावचे उरुसाप्रमाणे मांसाहारी वनभोजन दिले जाते . धनगर ही जंगल रानोमाळची पशुपालनामुळे भटकी आदिवासी जमात आहे . गुढी पाडवा हे भारतीय नववर्ष या वर्षाची सुरवात श्री बिरोबा दर्शनाने करणेची पुर्वापार पद्धत आहे . त्यामुळे मेंढपाळीमुळे राज्यभर विस्कटलेला धनगर बांधव चालत बैलगाड़ी वा घोड़यावरुन पाडव्यापासून सातवे दिवसापर्यंत श्रीक्षेत्र आरेवाड़ी मुक्कामी पोहचत आसत . मग आजपासून तीन दिवस यात्रेत मुक्काम असे . देव दर्शन ,मनोकामनापूर्ती, संकल्प, सुख दुःखच्या बोलण्यानंतर धनगर बांधव मांसाहारी जेवण आनंदाने घेऊन वा देऊन आपआपल्या मार्गी मोठया उत्साहाने मार्ग क्रमण करत आसत .
आजच्या काळात अशा जेवनाना पार्टी म्हटलेजाते . हा मांसाहार आंधश्रद्धेतुन होऊ नये . असे प्रबोधन सुरु आहे .काही जण हे नवस समजून कर्जबाजारी होऊन ही मांसाहारी भोजन देत आसतील तर मात्र ते योग्य नाही असेच म्हणावे लागेल
( केवळ माहितीसाठी
आम्हा येळावकर गावडे भावकीमध्ये मी ज्या बुडक्यामधून आहे त्याला " निमचा गावड़ा" मानले जाते . गावातील प्रत्येक शुभकार्यात पूर्वीपासून आमच्या घरातील एक मानाची सवाष्ण आसतेच )
विजय ग.गावडे ( कोळेकर)
महासचिव ,भारतीय धनगर परिषद
7588167034
महासचिव ,भारतीय धनगर परिषद
7588167034
Comments
Post a Comment