आदिवासी ठाकर समाज
औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासी ठाकर व आदिवासी भिल्ल आहेत. ते अजिंठ्याच्या डोंगरात राहतात. कन्नड तालुका, नांदगाव तालुका, सोयगाव तालुका,सिल्लोड तालुका चाळीसगाव तालुका आणि खुल्ताबाद तालुका या परिसरात मोडणाऱ्या भूभागांत जवळ जवळ तीस हजार आदिवासी ठाकर राहतात. त्यांचे देवदेवता, रुढीपरंपरा ,चालीरीती, पोषक, खानपान वगैरे अकोला संगमनेर, कळसूबाई परिसरातील आदिवासी ठाकरांप्रमाणेच आहेत. त्यांच्याशी यांचे नातेसंबंध आहेत.
आदिवासी ठाकरांच्या या परिसरात खोलापूर, गुजरदारी, कलंकी, शिप्घात(?), रंजाची वाडी, माणिकपुंज, काळदरी, तिसगाव, निरगुडी, पिप्री, लोंजे, चिवली, आदी तीस वाड्या आहेत. या वाडीवाडीत आगिवले, वारधे, सिद, सवत, पथवे, आवाले अशी तीस प्रकाराची आडनावे (कुलनामे) आढळतात. कुलनामानुसार त्यांचे देव्हारे विविध ठिकाणी आहेत.
या परिसरात आदिवासी ठाकर यांचे वास्तव्य गेल्या १०० ते १५० वर्षापासूनचे आहे. मात्र त्यांची दखल आजवर घेतली गेली नव्हती. त्यांना आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते, सोई-सवलती, शासकीय योजनांचा लाभ वगैरे मिळत नव्हते. गेल्या तीस वर्ष्यापासून कन्नड येथील महाविध्यालायाचे (कनिष्ठ ) प्राध्यापक डॉ. रमेश सूर्यवंशी हे या आदिवासींना न्याय, जातीची प्रमाणपत्रे मिळावीत म्हणून सतत लढा देत आहेत. केवळ या वर्षी वसंत सुदाम पाटील या अभ्यासू कमिशनर यांनी आदिवासी गावाला डॉ. रमेश सूर्यवंशी यांचेसहआणि त्यांच्या विभागाचे महाराष्ट्रातील आठही विभागातील दक्षता पथकातील १०० अधिकाऱ्यांसह भेट दिली. हे ठाकर खरोखारोच आदिवासीच आहेत हे त्यांची बोली, पोषाख, देवदेवता, चालीरीती रुढी परंपरा, ई. तपासून पहिले. आणि या परसारीतील आदिवासी बाबतीत हि स्वातंत्र्य काळातील पहिली घटना म्हणावी, त्या दिवसी त्यांनी सर्वांना आदिवासी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले जातील हि घोषणा केली. आणि २०११ या वर्ष्यात कन्नड तालुक्यात व खुलताबाद तालुक्यात जवळ जवळ पाच हजार आदिवासी ठकराना जातीची प्रमाण पत्रे देवून ती प्रमानितहि (व्हयालीडीटी ) केलीत. मात्र वसंत सुदाम पाटील यांची बदली झाल्यानंतर पुन्हा ए रे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे.
व्युत्पत्ती/उत्पत्ती
कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकर वाडीच्या देवाजी काळूजी आगिवले यांनी सांगितले की ठाकर हे मूळचे मुंगी पैठणचे. निजामाच्या जाचामुळे ते बालाघाट, कोकण,जुंदारखोरा, महालदेश, या ठिकाणी डोंगर दऱ्याखोऱ्यात लपले. तीन पिढ्यापासून पैठण सोडले. तेथून ते कोकणातील टाकेदला गेले. तेथून ते नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले. निजामाच्या सैनिकांशी दोन हात करतांना बायका आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळत व त्या युद्धास सज्ज होत असत. पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच आहे. हा लढा शिवाजीच्या काळात दिला असेही सांगितले जाते.
कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकर वाडीच्या देवाजी काळूजी आगिवले यांनी सांगितले की ठाकर हे मूळचे मुंगी पैठणचे. निजामाच्या जाचामुळे ते बालाघाट, कोकण,जुंदारखोरा, महालदेश, या ठिकाणी डोंगर दऱ्याखोऱ्यात लपले. तीन पिढ्यापासून पैठण सोडले. तेथून ते कोकणातील टाकेदला गेले. तेथून ते नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले. निजामाच्या सैनिकांशी दोन हात करतांना बायका आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळत व त्या युद्धास सज्ज होत असत. पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच आहे. हा लढा शिवाजीच्या काळात दिला असेही सांगितले जाते.
पाथवे नावाचे ठाकर पळून पिठ्या डोंगरात गेले. तेथून ते वैतर डोंगरात गेले. ते गाव धरणात बुडाले. तेथून ते घोतीपासून ५ मैल दूर असलेल्या धनुली या गावी आले. तेथून बहिरवाडी आले. तेव्हा त्यांनी पथवेचा देव्हारा हा धनुलीहून बहिरवाडीला हलवला.
शिवाजीच्या काळात ठाकर हे मावळे होते, पथवे यांना जहागिरी मिळाली, मेंगाळ ठाकर हे चपरासी होते तर गावंडे ठाकर हे कोतवाल होते. गुन्हेगाराला तापलेल्या तव्यावर उभे करणे हे काम कोतवाल करी. अशा विविध दंतकथा ऐकू येतात.
भाऊ संदर्भ स्रोत आहे का? जय आदिवासी जय भिल
ReplyDelete