सध्या जन्माने अब्राह्मण परंतू अंगिकार मात्र ब्राह्मणांहून कडव्या ब्राह्मण्यवादाचा अशा भंगारांच्या झुंडीच्या झुंडी निर्माण होत आहेत.

सध्या जन्माने अब्राह्मण परंतू अंगिकार मात्र ब्राह्मणांहून कडव्या ब्राह्मण्यवादाचा अशा भंगारांच्या झुंडीच्या झुंडी निर्माण होत आहेत. त्यांना थोपवीणे जिकिरीचे परंतू आवश्यक आहे. कारण ही बाटगी मंडळी सर्वाधिक असहिष्णू आहे. By Prakash Zaware Patil
हि भंगार बाटगी मंडळी कोण?
स्वातंत्र्य मिळाल्यावर ९० टक्के बहुजन समाज खेड्यामध्ये मातीच्या घरात राहत होता.कुळाने शेती कसत होता.स्टेट सावकाराकडून सवाई दिढीने कर्ज काढत होता.व त्याच शेत सावकाराला स्वस्तामध्ये शेतमाल विकत होता.गव्हाची पोळी आणि भात हि त्याच्या दृष्टीने चैन होती.सणासुदीला फक्त मोठ्या मुश्किलीने हि चैन तो करू शकत होता.तर पोराबाळांना शिकवायचे बळ त्याच्यात कसे असणार? मुठभराकडे दसरा दिवाळी साजरी व्हायची. हा मात्र थंडी पावसात शेतात पडलेला असायचा.नेहरूंच्या समाजवादी धोरणामुळे जमीन सुधारणा कायदे आले.कुळ कायदा आला.जमिनीचा स्वमालकीचा तुकडा मिळाला.सहकारी पतसंस्थामुळे काही प्रमाणात सावकारा वरील अवलंबित्व कमी झाले .बँकांचे राष्ट्रीयकरण झाले गोर गरिबाला गाय,शेळ्या मेंढ्या साठी कर्ज मिळू लागले.त्या आधी बिगर सहकारी बँकात शिरायची पण त्याची हिम्मत नव्हती.कर्ज मिळणे तर दूरच.या सगळ्या धोरणांना भारतातील उजव्या पक्षांचा विशेषतः जनसंघाचा विरोध होता.कारण यातून ज्या शेट सावकारांचे नुकसान होणार होते तेच जनसंघाचे पाठीराखे होते.गाव गावात अनुदानित शाळा आल्या.परिवहन मंडळाची बस खेड्या पाड्यात पोहोचली.आता या शोषितांची मुलं मुली शिकू लागली.त्यांना नोकर्या मिळू लागल्या.ते शहरात राहू लागले.आणि मग या प्रतिगामी लबाडानि त्यांना पेटवायला सुरुवात केली.मध्यम वर्गात प्रवेश केल्यावर त्याच्या पुढे नवीन प्रश्न उभे होते.पण या भामट्यांनी त्याचं सुलभीकरण केले.आधी दलित मग मुसलमान त्यांच्या प्रश्नांना जबाबदार असल्याचा समज पद्धतशीर पणे पसरवण्यात आला.त्यात भरीस भर म्हणून बाबा बुवांचे पिक आले.नारायण नागबली, कालसर्पयोग असे विधी त्र्यम्बकला जाऊन करू लागले.त्यांना आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न पुरोगामी नेतृत्वाने केला.पण या बाडग्यानि सांकृतिक गुलामागिरी स्वीकारली.संभाजी भिडे सारखे नव नवीन गुरुजी तयार झाले. कारण या बाडग्यांचा चा बौद्धिक आळस यांना खर्या इतिहासापासून लांब ठेवतो.तो चिकित्सा करायला तयार नाही.कोणी तसा प्रयत्न केला तर ज्या शक्तींनी यांच्या शोषणाचे समर्थन केले आहे,त्यांचेच ऐकून बिनडोकपणे प्रबोधन करणाऱ्यावरच हल्ले करतो. संघ परिवाराने धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी त्याचा शिताफीने वापर करून घेतला.व सत्ता मिळवली.मग तर यांना माजच चढला.
महात्मा फुले,राजर्षी शाहू, महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर,नेहरू ,इंदिराजी,यशवंतराव चव्हाण ज्यांच्या मुळे यांना चांगले दिवस दिसले त्यांच्या टिंगल टवाळी ला हे बाडगे टाळ्या वाजवू लागले.या हरामखोरी काय म्हणावे?


https://www.facebook.com/dilip.chavan.357/posts/1049880668452333?pnref=story

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).