चंद्रगुप्त मौर्य, भारताचा अद्वितीय सम्राट, स्वातंत्र्याचा आद्य उद्गाता एका सामान्य मेंढपाळ समाजात जन्माला आला.
चंद्रगुप्त मौर्य, भारताचा अद्वितीय सम्राट, स्वातंत्र्याचा आद्य उद्गाता एका सामान्य मेंढपाळ समाजात जन्माला आला. मुद्राराक्षस नाटकात चाणक्यही त्याची सतात "वृषल"(शूद्र) म्हणून हेटाळणी करतांना दिसतो. हे नाटक चवथ्या शतकानंतर, जेंव्हा वर्णाहंकार वाढू लागले होते, तेंव्हा कधीतरी लिहिले गेले आहे.
पण आज हेच नाटक ऐतिहसिक मानले जावे हे दुर्दैव आहे.ते एक नाटक आहे. चंद्रगुप्त होऊन गेल्यानंतर सात-आठशे वर्षांनंतर लिहिले गेलेले आहे याचे भान आम्हाला नाही. आम्हाला अजून माणसाला माणूस समजायची दानत नाही. त्याच्या भव्यता या जाती-वर्णांच्य फुटपट्ट्यांनी मोजता येत नाहीत हे समजत नाही.
किंबहुना भारताचा पहिला सम्राट सामान्य मेंढपाळी करणा-या घराण्यातून जन्माला यावा हेच सहन होत नाही. म्हणून त्याच्य जन्मकुळाबद्दल एवढे घोळ घालतो कि बस्स!
किंबहुना भारताचा पहिला सम्राट सामान्य मेंढपाळी करणा-या घराण्यातून जन्माला यावा हेच सहन होत नाही. म्हणून त्याच्य जन्मकुळाबद्दल एवढे घोळ घालतो कि बस्स!
Comments
Post a Comment