सम्राट चंद्रगुप्त मौर्य अणि त्याच्या जन्मकुळाबद्दल घातलेले घोळ
सम्राट चंद्रगुप्त मौर्य अणि त्याच्या जन्मकुळाबद्दल घातलेले घोळ
भारतीय संसदेच्या प्रांगणात भारताच्या पहिल्या सम्राटाचा एक प्रतिकात्मक पुतळा स्थानापन्न करण्यात आला आहे व त्याखाली गौरवाने लिहिलेय- "Shepherd boy-Chandragupta Maurya dreaming of India he was to create". विशेष म्हणजे हा पुतळा हिल्डा सेलेगम्यन या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महिला शिल्पकाराने तयार करुन संसद भवनाच्या परिसरात बसवण्यासाठी दान दिला होता. एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले. ग्रीकांविरुद्धचा पहिला स्वातंत्र्यलढा उभारला. त्यांना भारतातून अथक प्रयत्नांनी हुसकले आणि नंतर "गंग" सम्राट चंद्रमासि(ग्रीक उच्चार क्झ्यंड्रमास) चा पराभव करीत आपली एकछत्री सत्ता उभारली. भारतीय लोकशाहीने त्याला वाहिलेली ही मानवंदना आहे यात शंका नाही. हा गौरवशाली इतिहास आपण येथे थोडक्यात पाहुयात.
मोरिय कुळ
चंद्रगुप्ताचे "मौर्य" हे आडनाव कसे आले, त्याचे मूळ काय यावर इतकी परस्परविरोधी माहिती जातककथा, जैनसाहित्य, पुराणे व ग्रीक साधनांत आलेली आहे कि कोणीही गोंधळून जावे.याचे कारण हे की "पाटलिपुत्र" या राजधानीचे इतिहासकारांनी चुकीचे समजलेले स्थान.प्राचीन मगध हे सध्याच्या बिहार मधे नसून "बलूचिस्तान" म्हणजे ईरान अणि भारताच्या सीमेवर होते.ग्रीक आक्रमणच्या वेळेस सिंधु नदीच्या पलीकडे सत्ता ही नंदा ची नसून "गंग" या शक्तिशाली घराण्याची होती.चंद्रमासि हा त्यावेळेस या घराण्याचा राजा होता. कोणी नंद राजाला मुरा नांवाच्या दासीपासुन झाला म्हनून मौर्य तर कोणी मोरिय गणातील म्हणून मौर्य अशा व्युत्पत्त्या दिल्या आहेत. भारतात इतिहासलेखनाची पद्ध्गतच नसल्याने पुराणकारांनी जेथे माहिती नाही तेथे स्वरचित दंतकथा घुसवल्या. खुद्द नंद घराण्य़ाच्या उगमाबद्दल व या घराण्यात किती राजे झाले याबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे आपल्याला विविध साधनांतुन आलेल्या माहितीचे तर्कशुद्ध विश्लेषण करीत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो (विनयकुमार मदने पाटील).
चंद्रगुप्ताचे "मौर्य" हे आडनाव कसे आले, त्याचे मूळ काय यावर इतकी परस्परविरोधी माहिती जातककथा, जैनसाहित्य, पुराणे व ग्रीक साधनांत आलेली आहे कि कोणीही गोंधळून जावे.याचे कारण हे की "पाटलिपुत्र" या राजधानीचे इतिहासकारांनी चुकीचे समजलेले स्थान.प्राचीन मगध हे सध्याच्या बिहार मधे नसून "बलूचिस्तान" म्हणजे ईरान अणि भारताच्या सीमेवर होते.ग्रीक आक्रमणच्या वेळेस सिंधु नदीच्या पलीकडे सत्ता ही नंदा ची नसून "गंग" या शक्तिशाली घराण्याची होती.चंद्रमासि हा त्यावेळेस या घराण्याचा राजा होता. कोणी नंद राजाला मुरा नांवाच्या दासीपासुन झाला म्हनून मौर्य तर कोणी मोरिय गणातील म्हणून मौर्य अशा व्युत्पत्त्या दिल्या आहेत. भारतात इतिहासलेखनाची पद्ध्गतच नसल्याने पुराणकारांनी जेथे माहिती नाही तेथे स्वरचित दंतकथा घुसवल्या. खुद्द नंद घराण्य़ाच्या उगमाबद्दल व या घराण्यात किती राजे झाले याबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे आपल्याला विविध साधनांतुन आलेल्या माहितीचे तर्कशुद्ध विश्लेषण करीत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो (विनयकुमार मदने पाटील).
नंद घराणे अवैदिक,(शूद्र) राजघराणे होते याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही.याचे कारण नंद घराणे हे पर्शियन म्हणजे "ज़रथुश्त्र" धर्माला मानणारे होते.बेबेलोनि साहित्यात डेरियस तृतीय(दारा तृतीय) या पर्शियन सम्राटाचा "नंदिन" असा उल्लेख सापडतो.दारा तृतीय अणि सिकंदराच्या युद्धाचा प्रसंग येथे आठवतो.बेबीलोनी साहित्यात एका पर्शियन सम्राटाचा उल्लेख "अर्थसता" असा केला आहे.मुद्राराक्षस या नाटकात चंद्रगुप्त मौर्या च्या पित्या चा उल्लेख "सर्वार्थ सिद्धि" असा केला आहे.पर्शियन इतिहासात ही "बेगॉस" या धूर्त प्रधानमंत्र्या द्वारे नउ सावत्र भावांच्या हत्येचा संदर्भ मिळतो (विनयकुमार मदने पाटील).
मौर्या हे सिंधु संस्कृतीतील म्हणजे गण संस्कृतीतील लोक होते.चाणक्य हा सुद्धा "तक्षशिला" म्हणजे सध्याचे अफगानिस्तान भागातील विद्यापीठाचा आचार्य होता.म्हणजे सगळे पुरावे हे ईरान,अफगानिस्तान अणि सिंध प्रांताच्या भोवती फिरत आहेत.सिंधु संस्कृतीच्या पतनानंतर बरेच सिंधुवासी पर्शिया भागात गेले होते (विनयकुमार मदने पाटील).
उत्तर भारतातील तत्कालीन अनेक जानपदे,महाजानपदे येथील राजवटी गंगानी हटवत आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे गंगा ना परशुरामानंतरचे सर्व-क्षत्रीय-संहारक ही पदवी वैदिक पुराणकारांनी दिली असल्यास नवल नाही. मौर्यही आपसूक शूद्रच ठरत असल्याने त्यांनाही नंदांसोबतच शूद्र ठरवण्याच्या नादात मुरादासीची दंतकथा निर्मण केली गेली असे स्पष्ट दिसते. प्रसिद्ध इतिहासकर राधाकुमूद ब्यनर्जीही या कथेला "पुराणकारांची भाकडकथा" असे म्हणतात.बौद्ध साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मोरिय गणातील तरुण होता व हा गण शाक्य गणाशी निगडित होता असेही सुचवलेले आहे.जैन साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मयुरपालन करणा-या खेड्याच्या प्रमुखाच्या मुलीचा पुत्र होत म्हणून त्याला मौर्य हे नांव पडले.वरील विविध कथा पाहिल्या तर त्या परस्परविरोधी व गोंधळाच्या आहेत हे उघड आहे. भारतात पुरातन काळी अनेक राजारहित गणराज्ये किंवा राजा निवडनुकीने निवडणारी गणरज्ये होती. ही राज्ये प्राय: लहाण असत. या गणांची नांवे अनेकदा त्यांच्या कुलचिन्ह/देवक यावरुन पडत. नागवंश, गरुडवंश, सुर्य-चंद्र वंश इत्यादि नांवे त्यांना प्रिय असलेल्या प्राणी/पक्षी/ग्रह-तारका अथवा वृक्षांवरुनही पडत. आजही भारतात ही देवकप्रथा पाळली जाते. चंद्रगुप्त मोरिय गणातील तरुण असावा याला अजुन एक पुरावा ग्रीक साहित्यात येतो. मोरिय नांवाचा गण तेंव्हा खरेच अस्तित्वात होता.
पुढेल प्रश्नाकडे वळण्याआधी वरील दंतकथांवरुन काय स्पष्ट होते हे पाहुयात. मोर हे देवक असलेल्या कुळात/गणात चंफ़्द्रगुप्ताचा जन्म झाला होता. हे कुळ परंपरेने पशुपालनाशी संबंधीत होते. त्याचे वडील त्याच्या जमातीचे प्रमूख असतील किंवा नसतीलही, परंतू हे पश्चिमोत्तर भारतातील अनेक पशुपालक घराण्यांप्रमाणे एक होते. मोर हे मौर्य घराण्याचे देवक/कूलचिन्ह होते याचे पुरावे खुद्द सम्राट अशोकाने आपल्या काही शिलालेखांवर वसांची येथील स्तुपावर मयुरचिन्हे कोरून आपल्यासाठी सोडले आहेत. नंदनगढच्या अशोकस्तंभाच्या पायथ्याशे मयुरप्रतिमा दिमाखात चित्रीत केलेली आहे. हे पुरावे पाहुन पुरातत्वविद सर जोन मार्शल यांनीही मान्य केले कि मोर हे चंद्रघुप्ताच्या घराण्याचे प्रतीकचिन्ह आहे हे वास्तव या प्रतिमा घडवणा-यांनी जीवंत ठेवले आहे.
असो.
असो.
सर्व दंतकथा चंद्रगुप्त या काळात मगध (आताचा बिहार) प्रांतात आश्रयाला आला होता असे सुचवितात. पुष्पपूर म्हणजे कुसूमपुर अर्थात पाटलीपुत्र असा अर्थ बव्हंशी विद्वानांनी लावला आहे. परंतू चंद्रगुप्ताच्या आरंभेच्या काळातील घटना पाहिल्या व चाणक्याच्याही जीवनाशी तुलना केली तर सत्य वेगळेच असल्याचे लक्षात येते.
चाणक्य हा एक विद्वान ब्राह्मण होता.तो तक्षशिला येथील तत्कालीन जगप्रसिद्ध विद्यापीठात नुसता शिकला होता असे नाही तर तेथील अध्यापक होता. चाणक्य मुळचा कोठला व त्याचे खरे नांव काय याबद्दलही घोळ आहेतच. काही विद्वान त्याला दाक्षीणात्य मानतात तर काही तो मुळचा तक्षशिलेचाच होता असे मानतात. चाणक्याचा मगधाशीही घनिष्ठ संबंध असून तो पाटलीपुत्रास नेहमी जात असे असेही मानले जाते. धनानंदाने त्याचा अपमान केल्याने या घराण्याचा विनाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली होती अशी सुरस दंतकथा तर खुपच प्रसिद्ध आहे.पण तसे वास्तव नाही।
गंग सम्राज्याची सैनिकी शक्ती एवढी अपार होती कि खुद्द अलेक्झांडरचे सैन्य चीनाबच्या पुढे सरकायची हिम्मत करु शकले नव्हते हा प्रत्यक्ष इतिहास नजरेसमोर ठेवायला हवा. ग्रीक इतिहासकार प्लुटार्क नोंदवतो कि गंगानकडे दोन लाखांचे पायदळ, ८० हजारांचे घोडदळ, ८ हजार रथदळ आणि सहा हजारांचे हत्तीदळ होते. यात काही आतिशयोक्ती जरी असली तरी लष्करीदृष्ट्या गंगांची शक्ती तत्कालीन जगात अचाट होती असे म्हणावे लागेल. केवळ या सैन्यशक्तीला घाबरुन अलेक्झांडरला अधिक पुर्वेकडॆ सरकण्याचा विचार सोडून द्यावा लागला. त्याच्या सैन्यातील बंडाळीमुळे अलेक्झांडरला परत जावे लागले अशी कारणे ग्रीक इतिहासकारांनी दिली असली तरी ती सारवासारव आहे हे उघड आहे.प्लुटार्कनेच पर्दाफाश केला आहे.आणि ग्रीकांचे संकट सामोरे ठाकले असता चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा होऊ देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे.
आणि तसा विचार करायचेही काही कारण नाही हे घटनाक्रम नीट समजाऊन घेतला तर लक्षत येईल. मुळात चंद्रगुप्ताने आपला संघर्षाचा आरंभ गंगांपासून नाही तर पर्शियन सम्राज्या विरुद्ध केला होता.अलेक्झांडरचे आक्रमण इसपु ३२६ मद्धे सुरु झाले. पोरसचा पराभव आणि त्याचे मांडलिकत्वाची घटना याच वर्षी घडली. ग्रीकांनी तक्षशिलेसह बराच पंजाब आपल्या ताब्यात घेतला. सिंधु नदीचा पश्चिम भाग त्यांच्या ताब्यात आलेला होता. स्थानिक सत्ता कोलमडून पडल्या होत्या. आणि येथेच चंद्रगुप्ताचे अलौकिक कार्य सुरु होते. एक झुंजार सेनानी वनेता म्हणून तर "चाणक्याचे" चे कार्य एक कुटील मुत्सद्दी म्हणून.
ग्रीकांशी संघर्ष"
अलेक्झांडर महत्वाकांक्षी होता. तत्कालीन ज्ञात जग आपल्या सत्तेखाली आणन्याचे त्याचे स्वप्न होते. भारत जिंकला कि हे स्वप्न पुर्ण होईल असे त्याला वाटत होते. भारत जेथे संपतो तेथेच जगही संपते ही तत्कालील ग्रीकांची कल्पना होती. येथेवर तो सर्वत्र यशस्वी झाला होता.पण येथे गाठ आता पडणर होती ती चंद्रगुप्त आणि चाणक्याशी. परकीयांचे लोंढे बघुन दोघे कामाला लागले. त्यांच्याकडॆ धन नव्हते पण प्रबळ स्वातंत्र्यप्रेम होते. त्यांने सैन्य जमा करायला सुरुवात केली.कोण होते त्यांचे सैनिक? महावंस सांगते पंजाबमधील स्वातंत्र्यप्रिय गणंना एकत्र करत हे सैन्य उभारले गेले. योधेय गणही यात सामील होता.ग्रीक इतिहासकार जस्टिन म्हणतो , चंद्रगुप्ताने "दरोडॆखोरांचे" सैन्य उभारले. म्यक्डोनेल म्हणतो हे दरोडेखोर म्हणजे गणराज्यांचे नागरिक होते. या सैन्यात किरात, बाहीक, शिबी, उदुंबर, शुद्रक वगैरे गणराज्यांतील नागरिकांचा समावेश होता. एरियन हा ग्रीक इतिहासकार म्हणतो त्या काळी पंजाबची भुमी स्वतंत्रताप्रिय गणराज्यांच्या टोळ्यांनी भरली होती. या पराक्रमी विजिगिषू लोकांना चंद्रगुप्ताचे प्रभावी नेतृत्व लाभले व पहिला स्वातंत्र्य संग्राम सुरु झाला. स्त्रीयांनीही या युद्धात भाग घेतला.
येथे यशवंतराव होळकरांची आठवन येणे स्वाभाविक आहे. त्यांनीही खिशात दमडा नसता भिल्ल, पेंढारी यांची फौज उभारुन त्यांचा स्वातंत्र्य संग्राम सुरु केला होता...चंद्रगुप्तानंतर तब्बल २ हजार वर्षांनी!
राधाकुमुद बानर्जी म्हणतात, चंद्रगुप्ताने दिलेला लढा हा अलेक्झांडरच्या विजयांपेक्षाही नेत्रदिपक आहे. या लढ्यात सुरुवातीला विजय मिळाले नाही. हजारोम्चे सैन्य मारले गेले वा बंदी झाले. याचे कारण म्हणजे सारेच सैन्य हे प्रशिक्षित,अनुभवी नव्हते. पण चंद्रगुप्ताने हळू हळू या विखुरलेपणाला शिस्त आणली. गनीमी काव्याचा अवलंब सुरु केला. पोरस (पर्वतक) हा चंद्रगुप्ताला सामील झाला. बहुदा याच काळात कधीतरी चंद्रगुप्ताची भेट खुद्द अलेक्झांडरशी झाली. या भेटीत काय घडले याचा वृत्तांत उपलब्ध नाही. शिवाय ही भेट युद्धाच्या आधी कि मध्यकाली झाली हे नक्की नाही. त्यामुळे भेट झाली हे खरे असले तरी त्यावर अभिप्राय देता येत नाही.
पण या अनपेक्षित उठावामुळे अलेक्झांडर त्रस्त झाला. त्याला भारतात ग्रीकांच्या, अन्यत्र केल्या तशा वसाहती स्थापन करायच्या होत्या. त्यासाठी त्याने सहा छत्रप नेमले होते. सिंधू नदीच्या पश्चिमेला तीन तर पुर्वेला तीन. आहे तोच भाग तरी सुस्थिर आपल्या अंमलाखाली ठेवावा असे त्याला वाटने स्वाभाविक होते. पण चंद्रगुप्ताने आपल्या हस्तकांकरवी छत्रप निकानोर व फिलिप यांची हत्याही घडवून आणून अलेक्झांडरच्या मनसुब्यांना हादरा दिला. यामुळे ग्राकांचे मनोधैर्य अजुनच ढसळले.
दरम्यान अलेक्झांडर परतीच्या वाटेला लागला होता. त्याचे परत फिरणे हा योगायोग नव्हता. आधी सतत जिंकण-या ग्रीकांन हताश व्हावे असे वाटावे हे घडणे दैवयोगही नव्हता. त्यामागे भारतीय गणांची एक सुसुत्र चाल होती ज्याचे नेतृत्व चंद्रगुप्ताने केले तर सारे कुटील मार्ग (जे युद्धात क्षम्य असतात) ते चाणक्या ने दाखवले. कौटिल्य हे चाणक्याचे उपनाम त्यामुळेच पडले असे म्हणायला वाव आहे. ग्रीक छत्रपांचे पडणारे खुनही अपघात नव्हते तर त्यामागे एक सुसुत्र कट होता. इसपु ३२५ ते इसपु ३२३ या अवघ्या दोन वर्षाच्या काळात जगज्जेद्त्या सिकंदराला माघारी फिरावे लागले. छत्रपांच्या खुनांमुळे त्याने मागे सोडलेले साम्राज्याचे अंशही कोसळले.
ग्रीकंचा इतिहासकार जस्टिन म्हणतो,"या स्वातंत्र्यलढ्याचा नायक "सेंड्रोकोटस"(चंद्रगुप्त) होता. एका सामान्य कुळातला माणूस सम्राट होण्याच्या खरोखर योग्यतेचा होता. हा एक अलौकिक शक्तींनी भरलेला तरुण. याने अलेक्झांडरचाही प्रत्यक्ष भेटीत अपमान केला. त्याला मारायची आज्ञा दिली तर हा पावलांच्या चपळाईने निसटला.....याने दरोडॆखोरांची फौज प्रेरित करुन जमवली अणि ग्रीकांची सत्ता उलथुन टाकले."
जस्टिन हे नि:संदिग्धपणे सांगतो कि ग्रीकांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाचा नायक चंद्रगुप्त होता. जस्टिन हा इसवी सनाच्यादुस-या शतकात झालेला रोमन (ल्यटिन) इतिहासकार. आपला पुराणकार नव्हे. ग्रीक साधनांतुन अभ्यास करुन त्याने हा निष्कर्श काढला आहे. आमचे पुराणकार शेंडीच्या दंतकथा रंगवत चंद्रगुप्त व चाणक्याने दिलेल्या, सामान्य लोकांच्या मदतीने दिलेला माहान लढा यावर अवाक्षरही काढत नाहीत हे विशेष!
एका अर्थाने चंद्रगुप्ताचा पहिला स्वातंत्र्यलढा इसपू २२३ मद्ध्ये संपला. गंगाशी त्याने केलेला संघर्ष यानंतरचा आहे. त्या संघर्षाचा संबंध चाणक्याने केलेल्या प्रतिज्ञेशी नाही हे मी वरच सांगितले आहे. त्यामागील कारणे नंद शूद्र होते, अन्यायी होते यात नसून नंदांच्या नऊ पिढ्यानंतर लोपलेल्या साम्राज्य (पर्शियन) विस्ताराच्या आकांक्षांच्या झालेल्या अंतात आहेत. जेंव्हा चंद्रगुप्त व त्याचे साथी गणराज्ये ग्रीकांशी लढत होती खरे तर सिन्धुच्या पलीकडील गंगानीही आपले अपार सैन्यबळ घेऊन साथीस यायला हवे होते. मग लढा सोपा झाला असता. पण गंग गप्प बसले . त्याचे अचाट सैन्यबळ कामाचे ठरले नाही. ग्रीकांच्या आक्रमणामुळे व त्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे पश्चिमोत्तर सीमा नुसत्या सुरक्षित नव्हेत तर विस्तारायला हव्यात हे चंद्रगुप्त व चाणक्याच्या लक्षात आले नसले तरच नवल!
गंग त्या काळात भारताची सांस्कृतिक राजधानी होती. शैव, वैदिक, जैन, बौद्ध, आजीवक, श्रमण, चार्वाकादि तत्वज्ञानांची केंद्रे मगधात होती. "राजगृह" ही राजकीय सत्तेची राजधानी. आजच्या दिल्लीला जिंकले म्हणजे जसा भारत जिंकला तसे राजगृह जिंकले म्हणजे भारताची प्रभुता असा समज त्या काळी होता. गंग अल्पसंतुष्ट व अदूरदृष्टीचे बनले होते. त्यामुळे त्यांना मागे सारून आता नव्या नवोन्मेषी सत्तेची गरज होती.
चंद्रगुप्त आता या कार्यासाठी सिद्ध झाला.
गंग साम्राज्याशी संघर्ष:
जसा ग्रीकांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याची नोंद भारतातील धर्माश्रयी पुराणकारांनी ठेवली नाही तशीच गंगाशी शी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याचीही नीटशी नोंद नाही. दंतकथांतुन हाही इतिहास शोधावा लागतो. चंद्रगुप्ताने मगधाच्या सीमेवर हल्ले करत राजगृह पर्यंत फोचायची आधी चाल खेळली. पण त्यात सुरुवातीला त्याला अपयशे आली.
महावंसातील एक दंतकथा सांगते कि, चंद्रगुप्ताच्या हेराने एका खेड्यातील महिलेच्या चंद्रगुप्ताबाबतच्या वक्तव्याची माहिती त्याला दिली.ती अशी होती...तिचा मुलगा रोटीच्या कडा तशाच ठेऊन फक्त मधलाच भाग खायचा. त्यामुळे रोटी लगेच संपायची. यावर ती महिला मुलाला म्हणाली,
"तू चंद्रगुप्तासारखाच वागतो आहेस!"
"का असे म्हणलीस?" मुलाने विचारले.
"तोही वेड्यासारखा आघाडीची शहरे ताब्यात न घेता सरळ राजधानीत घुसून सम्राट बनु पाहतोय!"
"का असे म्हणलीस?" मुलाने विचारले.
"तोही वेड्यासारखा आघाडीची शहरे ताब्यात न घेता सरळ राजधानीत घुसून सम्राट बनु पाहतोय!"
चंद्रगुप्ताने सुरुवातीला मगधावर आक्रमण करतांना जिंकलेल्या भागावर आपले प्रशासन व सैनीकी बळ ठेवण्यावर लक्ष दिले नव्हते असे या दंतकथेवरुन दिसते. चंद्रगुप्ताला सिकंदराशी लढायला मदत करणारी पराक्रमी सेना होती. गंगा चे सैन्य प्रबळ होतेच. पण तो संख्येचा दबदबा होता हे चंद्रगुप्ताने सिद्ध करुन दाखवले. तरीही त्याला गंगा ना पराजित करायला तब्बल दोन अथवा त्याहून अधिक काळ लागला.
चंद्रगुप्ताने राजगृहाचा परिसरही ताब्यात घेतला. राजगृहला वेढा घातला. गंगाने ने पराजय मान्य केला. आता त्याच्याकडे ना सैन्यही उरले होते कि बळ अथवा धनही.
हरलेल्या शत्रुला मारण्याची तशीही भारतीय परंपरा नाही. गंगाला ठार मारावा असा दुष्टही नव्हता. माहिती मिळते ती अशी- गंगाला राजगृहातून तुन निष्कासित करण्यात आले. त्याला सोबत त्याच्या दोन्ही पत्न्या आणी त्याच्या रथात बसेल एवढे धन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली.
इसपू ३२१ मद्ध्ये चंद्रगुप्ताचा अभिषेक खुद्द चाणक्याने केला असे दिसते. गंग घराण्याच्या वंशजांचे नांव इतिहासात नंतर पुसलेच गेले.
चंद्रगुप्ताने उर्वरीत अर्शा भारत व पश्चिमोत्तर भारत तर ताब्यात घेतलाच पण पर्शियापर्यंत मोहिमा करुन तेथील ग्रीक शासक सेल्युकस निकेटरलाही नमवले. नंतर मैत्र साधले.त्याला ५०० हत्ती भेट दिले तर त्याच्या कन्येला पत्नी म्हणून स्वीकारत वैश्विक मैत्रीचा आदर्शही घालून दिला.
मोठेपन जातीत नसते. वर्णात नसते. ते स्वभावात असते...वर्तनात असते. गंग घराणे शूद्र असले तरी ते अन्यायी नव्हते. त्यांनीही आपल्या सामर्थ्याने ग्रीकांना पुढे सरकायची हिम्मत करु दिली नाही.त्यंची चूक एवढेच कि त्यांनी खुद्द त्या संग्रामात उतरायला हवे होते. ते झाले नाही म्हणून त्यांनाही राष्ट्रकार्यासाठी सत्ताभ्रष्ट करावे लागले. त्यांचा सुड घेतला गेला नाही.
चंद्रगुप्त मौर्य, भारताचा अद्वितीय सम्राट, स्वातंत्र्याचा आद्य उद्गाता एका सामान्य मेंढपाळ समाजात जन्माला आला. मुद्राराक्षस नाटकात चाणक्यही त्याची सतात "वृषल"(शूद्र) म्हणून हेटाळणी करतांना दिसतो. हे नाटक चवथ्या शतकानंतर, जेंव्हा वर्णाहंकार वाढू लागले होते, तेंव्हा कधीतरी लिहिले गेले आहे. पण आज हेच नाटक ऐतिहसिक मानले जावे हे दुर्दैव आहे.ते एक नाटक आहे. चंद्रगुप्त होऊन गेल्यानंतर सात-आठशे वर्षांनंतर लिहिले गेलेले आहे याचे भान आम्हाला नाही. आम्हाला अजून माणसाला माणूस समजायची दानत नाही. त्याच्या भव्यता या जाती-वर्णांच्य फुटपट्ट्यांनी मोजता येत नाहीत हे समजत नाही.
किंबहुना भारताचा पहिला सम्राट सामान्य मेंढपाळी करणा-या घराण्यातून जन्माला यावा हेच सहन होत नाही. म्हणून त्याच्य जन्मकुळाबद्दल एवढे घोळ घालतो कि बस्स!((संदर्भ :संजय सोनवाणी)
Comments
Post a Comment