पुंड्र आणि औंड्र हे मुळ आर्य वंशी होते.
पुंड्र आणि औंड्र हे मुळ आर्य वंशी होते. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादिनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत.पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)
सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
Comments
Post a Comment