काळामुखी शैव
लिंगायत धर्म संकल्पिका माता नागाई - विदेशी युरेशिअन ब्राह्मणांनी मनुस्मृती सातव्या शतकापासून उत्तर भारतात लागू करण्यास सुरुवात केली आणि त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात तथा दक्षिण भारतात अकराव्या बाराव्या शतकात सुरुवात झाली. भारतात शैव संस्कृतीचे अवशेष होते त्यामध्ये शुद्ध शैव ,पाशुपत शैव ( काळामुखी शैव ) , कापालिक शैव अशा संप्रदायामध्ये समाज विखुरलेला होता क्रांतिवीर बसवन्ना माता नागाई यांचे कुटुंब काळामुखी शैव होते. ब्राह्मण इतिहासकरानी ते ब्राह्मण होते असा खोटा प्रचार केला आहे. या शैव संप्रदायाचे अनुयायी विद्वान आणि शास्त्र पारंगत होते. काळामुखी शैवांनी दक्षिण भारतात निर्माण केलेल्या मठ संस्था विद्येची माहेर घरे आणि शिक्षणाची केंद्रे बनली होती. श्रीशैल्य, बल्लीगवे आणि कुडलसंगम हि शैवांच्या धर्म प्रचारकांच्या अभ्यासाची फार प्रसिद्ध शिक्षण केंद्रे होती त्यामुळे माता नागाई आणि बसवन्ना आणि त्यांच्या परिवारात शिक्षणाची परंपरा होती आणि ते साक्षर होते म्हणून त्यांनी वचनांची निर्मिती केली. जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेला विरोध करण्यासाठी माता नागाई यांनी बसवन्ना यांना प्रवृत्त केले आणि एका आंदोलनाची सुरुवात केली आणि त्या आंदोलनाला नाव दिले " लिंगायत " - माता नागाई या बसवन्नांच्या थोरल्या भगिनी आहेत त्या दोघामध्ये तीन वर्षाचे अंतर आहे. माता नागाई यांचे एक वचन - "बसव माझा सहोदर साथी । बसवला प्रेमे कुरुवाळले मी । बसवा संगन बसवा जयतु । बसवाला मला भेदभाव नाही । बसवाची माझी जुळली हो रास । बसव प्रिय चन्न संगय्यामध्ये । बसवाला जन्म न दिलेली बाळंतीण मी । बसवा बसवा ।"
Comments
Post a Comment