महारठ्ठ आणि मराठा


संजय सोनवणी यांनी व या अगोदर अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते. मरहट्टी ही प्राचीन काळतील लोकप्रिय भाषा होती. सातवाहनकालीन साहित्य हे मरहट्टी भाषेत आहे. मरहट्ट्यांची भाषा ती मरहट्टी. मराठा व मराठी हे शब्द अगदी अलिकडेपर्यंत मर्हाटा व मर्हाटी असे लिहिले जात असत. आजची मराठी ही मरहट्टी भाषेचे अपत्य आहे, संस्कृतचे नव्हे, तसेच आजचा मराठा हा शब्द मरहट्टा या शब्दाचे अपत्य आहे, महारठ्ठ या शब्दाचे नव्हे.
याउलट महारट्ठ हा शब्द महार व महाराष्ट्र या शब्दांना जवळचा आहे. प्रसिद्ध विदुषी दुर्गा भागवत यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे म्हंटले आहे. ते जास्त बरोबर वाटते.
राजपुतांना अनेक संशोधकांनी सिथिअन (शक) ठरवले आहे. पण सगळेच राजपूत हे सिथिअन नाहीत. जसे, राजपुतातील राठोड हे मूळचे दख्खन वरचे राष्ट्रकूट (मूळ मरहट्टी शब्द रट्टुउड) आहेत. तसेच त्यांच्यातील सोळंकी हे मूळचे दख्खन वरचेच चालुक्य आहेत.
राजपूतांमध्ये गंग, होयसळ-यादव, शिलाहार अशा अनेक कुळ्या आहेत, ज्या सिथिअन वंशाच्या नाहीत.राजपुतांच्या कुळ्यांमध्ये चंद्रवंशी, सुर्यवंशी, यदुवंशी, नागवंशी असे प्रकार आहेत. त्यातील फक्त सुर्यवंशी कुळ्या याच फक्त सिथिअन असू शकतात. अनेक मराठ्यांचे मूळ कर्नाटक मध्ये आहे. पण काहीजण प्रत्येक मराठ्यांचे मूळ राजस्थानात शोधतात. ते पूर्ण चुकीचे आहे.
मुळात ९६ कुळ्या हा प्रकार अगदी अलिकडचा आहे. शिवपूर्वकाळात कुळ्यांची संख्या फारच कमी होती. त्यातील प्रमुख कुळ्या यादव, मोरे, कदम, राष्ट्रकूट(राठोड),चालुक्य, शिंदे, कलचुरे,शिलाहार, सावंत, पवार, साळवी या होत्या. शिवकालानंतर कुळ्यांची संख्या वाढत जावून ती ९६ झाली. याचे कारण म्हणजे शिवकालात मराठा या शब्दाला महत्व आले. त्यामुळे अनेक समूह स्वत: ला मराठा म्हणवून घेऊ लागले. दुसराही एक प्रकार घडला, तो म्हणजे जुन्या कुळ्याचे विभाजन एका कुळीतून दोन वा अधिक कुळ्या उदयाला आल्या.
भोसले हे मूळचे होयसळच असले पाहिजेत. ते सिसोदिया असते तर त्यांनी सिसोदिया अथवा सिसोदे हेच नाव कायम ठेवले असते. याउलट बैंसला आणि होयसळचा अपभ्रंश होवून भोसले हे आडनाव तयार झाले असणे जास्त शक्य वाटते. देवगिरीचे यादव आणि होयसळ यांचे पूर्वापार संबंध होते ही गोष्टही या दृष्टीने विचार करण्यासारखी आहे.

Comments

  1. तुझ्या आयचं भोक कारण मराठी हे भाषेला दिलेलं नाव आहे आणि मराठा ही खोटी जात आहे

    ReplyDelete
  2. ऐतिहासिक पुराव्यानुसार महाररठ्ठ हेच महारठ्ठचे मुळ नाव व गण आहे आणि महार लोक हेच या प्रदेशातील मुळ लोक आहेत !
    हव तर मानवंश शास्त्र चा आधार घेऊन अभ्यास करा

    ReplyDelete
  3. ऐतिहासिक पुराव्यानुसार महाररठ्ठ हेच महारठ्ठचे मुळ नाव व गण आहे आणि महार लोक हेच या प्रदेशातील मुळ लोक आहेत !
    हव तर मानवंश शास्त्र चा आधार घेऊन अभ्यास करा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).