इतिहासाच्या पानावर आजपर्यंत जे लिहिले गेले तेच खरे आहे असे म्हणणे मला संयुक्तीक वाटत नाही कारण जेव्हा मी महाराजा यशवंतराव होळकर यांचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की या देशातील इतिहासकारानी, लेखकानी, या मातीसाठी शहीद झालेल्या नररत्नानाची इतिहासात नोंद घेतली नाही.
महानयोद्धे राजे यशवंतराव होळकर
👉इतिहासाच्या पानावर आजपर्यंत जे लिहिले गेले तेच खरे आहे असे म्हणणे मला संयुक्तीक वाटत नाही कारण जेव्हा मी महाराजा यशवंतराव होळकर यांचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की या देशातील इतिहासकारानी, लेखकानी, या मातीसाठी शहीद झालेल्या नररत्नानाची इतिहासात नोंद घेतली नाही. मी यशवंतराव होळकर यांचा इतिहास वाचल्यावर माझ्या डोक्यात मुंग्या धावायला लागल्या, वाचताना शरीरावर रोमांचकारी शहारे उभे रहायला लागले आणि मनात प्रचंड अस्वस्थपणा जाणवायला लागला. मित्रहो हा मला वाटणारा अस्वस्थपणा सहज नव्हता हे काही सहज घडत नव्हतं ज्या महान योद्धाला आजपर्यंत आमच्या पासुन दुर ठेवले, ज्या नरसिहाला इतिहासाच्या पानावर आजपर्यंत जागाच दिली नाही त्या महान पराक्रमी महाराजा यशवंतराजे होळकर यांना जाणीवपूर्वक धनगर-ब हुजन समाजापासुन दुर ठेवले. का नाही समजु दिले आम्हा यशवंतराजे ? का या जागतिक योद्धाला दुर्लक्षीत केले ? हे तमाम प्रश्न मला अस्वस्थ करणारेच होते.
असे म्हटले जाते भारतभुमी हि महान राष्ट्रनायकाची जननी आहे आणि यशवंतराजे अभ्यासल्यावर माझा हा विश्वास आता हजार पटीने वाढला आहे की भारतभुमी खरचं महान आहे. कारण इतिहास जेव्हा मी डोकावतो तेव्हा या मातीने आजपर्यंत या राष्ट्राला प्रत्येक दशकात महान रणयोद्धे लोक जन्माला घातले आहेत कधी चंन्द्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक., छत्रपती शिवाजी महाराज तर कधी राजर्षी मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर या सारखे जिगरबाज पोलादी महापुरूष ही भुमी पुरवत गेली. पण सर्व योद्धाच्या पराक्रमी कर्तृत्वाला या देशातील जातीयवादी इतिहासकारानी, बखरकारानी, लेखकानी न्याय दिला असे कधी घडलेच नाही. त्या पैकीच एक राजे यशवंतराव होळकर आहेत. असे काय वैशिष्ट्य यशवंत राजेचे? असा कोणता पराक्रम यशवंत राजेचा जो आजपर्यंत दुर्लक्षीत ठेवण्यात आला? भारताच्या तडफदार तरूणांनो राजे यशवंतराव होळकर म्हणजे साधारण पुरूष नाही आहे. या देशाच्या स्वातंत्रासाठी इग्रंजाना एक वेळा नव्हे दोन वेळा नव्हे तर तब्बल अठरा वेळा पराभूत करणारे म्हणजे यशवंतराव आहेत. एक युद्ध पराभूत न झालेला विर म्हणजे यशवंतराव आहेत. स्वराज्यासाठी रयतेसाठी दिवसातुन रोज अठरा-अठरा तास घोड्यावर वादळासारखे घोगावणारे राजे यशवंतराव होळकर आहेत. स्वतःचा राज्याभिषेक करून राजमुद्रा निर्माण करणारे यशवंत होळकर आहेत. पण हा जाज्वल्य पुर्ण इतिहास नाही कळू दिला आम्हाला त्याचे कारण आहे धनगर-बहुजन समाजाच्या युवकांनी जर यशवंतराव होळकर अभ्यासले तर धनगर बहुजन युवकांच्या अस्मीता जागृत होवुन ते त्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी विद्रोह करतील ही भीती या देशातील एका वर्गाला सतत आहे.
पण आता तो दिवस दुर नाही ज्या दिवशी होळकर शाहीचा इतिहास जगाला कळेल आणि पुन्हा धनगर बहुजन युवक त्यांचा गौरवशाली इतिहास घडविण्यासाठी सिद्ध होतील.

धन्यवाद
जय मल्हार जय शिवराय
श्रीकांत बरींगे
अकोला
मो. 9766594325
अकोला
मो. 9766594325
नसे भय कुणाचे,विजयाचे आम्हा वेड
ReplyDeleteजिंकूनी दिशा दाही,रोवू अजिंक्यतेची मुहूर्तमेढ!
- मध्ययुगीन हिंदुस्तानातील एकमेव पहिले चक्रवर्ती महाराज,
शेवटचे सार्वभौम छत्रपती राजे,
पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत लढणारे अजिंक्य महायोध्दे
श्रीमंत चक्रवर्ती यशवंतराजे होळकर
जन्म :३ डिसेंबर १७७६ वाफगाव(जि.पुणे)महाराष्ट्र
राज्याभिषेक :६ जानेवारी १७९९
निर्वाण :२८ आॅक्टोबर १८११
संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारे महायोद्धे.
महाराजांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदौर/चांदवड गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. स्वत:चे राज्य स्वत:च्या हिंमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव शिद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.
राज्य नव्हे चक्रवर्ती साम्राज्य