इतिहास बदलविणाऱ्या परंतू दुर्लक्षित जमाति,वंश आणि त्यांची त्यांची मुळ कार्यक्षेत्रे

या जमाती दुर्लक्षित राहिल्या कारण दुर्गम भागात राहून या लोकांनी योद्धे घडविले. यांतील धारचे पवार आणि उज्जैन चे कार्दमकच फक्त प्रास्थापित घराणी होती परंतू नंतर त्यांचीही सत्ता गेली. नंतर हे दिल्ली सुलतानांचे सरदार बनले परंतू स्वराज्य स्थापनेचा कट यांच्या डोक्यात शिजत होता. त्यानुसार यांनी योजना आखल्या. बरेच दर्जेदार सरदार घडविले. भोसले वंशाला उचित ठिकाणी नेऊन पोहचविले. नंतर शिवछत्रपतींचे मुख्य शिलेदार हेच लोक होते. यांच्याशिवाय स्वराज्य स्थापनेची आपण कल्पनाच करू शकत नाही.छत्रपती शाहूंनी तर या लोकांना अमाप जहागिऱ्या लाटल्या होत्या.
मेंढपाळ,शेती,शिकार आणि किनारी भागात मासेमारी आणि मिठागरे चालवून हे लोक त्यांची उपजीविका करत. हे लोक दुष्काळी आणि डोंगराळ भागात शेती करत परंतू सुपीक भागात शेती करणारे कुणबी आणि यांच्यात दूर दूरचा फरक होता.
या भागातील राष्ट्रकूट,चालुक्य,यादव इत्यादी. मोठ्या साम्राज्यांत हाटकरांचा मोठा भरणा असे. बरेच हाटकर जहागिऱ्या मिळवून प्रस्थापित घराणी झाली होती.मात्र मुस्लिम आणि ब्रिटिश आक्रमणामुळे हाटकर पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे इथे उल्लेख केलेली बाकीची घराणी जहागीरदार म्हणून अगदी नव्यानेच उदयाला आलेली आहेत.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans