Posts

Showing posts from February, 2015

समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना.धों. महानोर,

शिवाजी महाराजाप्रमाणेच वेदीक पद्धतीने राज्याभिषेक करणारा एकमेव राजा म्हणून यशवंतराव होळकर   यांचा उल्लेख केला जातोय . समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना . धों . महानोर , विमानांचे गिअर बनविणार्र्या अमेरिकेतील ` यूएस एरोमोटिव ’ चे डॉ . सुहास काकडे , पहिले बॅरिस्टर तुकाराम शेंडगे , जिल्हाधिकारी जराड , राजूरकर , आयपियस अधिकारी मधूकर शिंदे , पद्मश्री डाॅ . विकास महात्मे , पहिले कृषी अधिकारी पांडुरंग लुबाळ , झुंझार व्यक्तिमत्व स्व . बी . के . कोकरे , डाॅ . शेबडे , अॅड . आण्णाराव पाटिल , समाजसेवक गुंडेराव बनसोडे , इतिहास संशोधक होमेश भुजाडे , कोकणे सर आदींची नावे घेतली जात आहेत . ए . एस . पुकळे , सातारा.

सम्राट अशोकाचे बलशाली भारताचे स्वप्न धनगर समाज पुर्ण करेल.

सम्राट अशोकाचे बलशाली भारताचे स्वप्न धनगर समाज पुर्ण करेल . आपल्या मुंबई महानगरीत विविध समाजगट गुण्यागोविंदाने राहत आहेत . त्यांच्या काही समस्या आहेत . आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक राजकीय कल देखील आहे . मुंबईचं अस्सल सामाजिक राजकीय विश्लेषण , ` धनगर सत्तेत किती ?. आज मुंबईतल्या धनगर समाजाचा आमचे प्रतिनिधी " होळकर बिग्रेड " ने घेतलेला वेध . धनगर . शेळ्या - मेंढय़ा राखणारी जमात . गोकुळ , वृंदावन आणि मथुरेहून मजल दरमजल करीत धनगर बंधू गुजरात आणि पुढे महाराष्ट्रात आले . हटकर , व्ह टकर , खुटेकर , शेंगर , अहिर , कुरुबा , भारवाड , खाटिक , कोकणी धनगर यासह धनगर समाजाचे जवळपास 14 उपघटक . शंकर , विष्णू , पार्वती , महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते . बिरोबा , जानुबाई , निनाई , मायाक्का , धुळोबा , शिदोबा , खंडोबा , म्हसोबा , विठोबा , जोतिबा , तुळाई , यमाई , अंबाबाई त्यांचे देव . धनगरी ओव्या गुणगुणायला लावणार्र्या नि धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे . पावसाळ्याचे चार महिने सोडल