वैदिकाची ॠषी परंपरा ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे

वैदिकाची ॠषी परंपरा ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर
धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे .
हलू म्हणजे दूध दुधावर जगनारा म्हणजे हा धनगर समाज .हलसिध्दनाथाची(अप्पाचीवाडी)
भाकणुक आजही प्रसिध्द आहे ."या देशावर भगवा झेंडा फडकेल " हे हुईक सांगितल गेल आहे .हालमत हे धनगर समाजाचे सत्यावर आधारित नैतिक विचारधारा आहे .हलमत हेच धनगर समाज भगवदगीते प्रमाणे मानतात .धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे .
कुरबर, कुरम्बा, धनगर ,भरवाड ,मालधारी, गाडरी, रायका ,रबारी, पाल, बघेल ,बकरवाल अशी एक ना आनेक बहुभाषिक नावाने धनगर समाज ओळखला जातो .
मुस्लिम समाजापेक्षा मोठी म्हणजे १५ ते १६ कोटि ही एकत्रित लोकसंख्या आहे .
औषधी युक्त शेळया मेंढ्याच दुधातुन आलेली कटाक निरोगीपणा मेंढ़पाळीतुन भटकंती त्यातून ज्ञान प्रदेशाची माहिती त्यामुळे सैन्यातील मोठा सहभाग हे धनगर समाजाचे वैशिष्ट्य राहिले आहे
धनगर ही मोठी उपेक्षित आदिवासी जमात विकसित समाजात आपली जागा शोधत आहे .हलमता प्रमाणे चालणारा हा समाज सत्यवचनी ,प्रमाणिक ,लढाऊ, देवभोळा ,नागरी रीतीरिवाजापासून दूर ,दिल्या बोलाला जागणारा ,समाज म्हणून प्रसिध्द आहे धनगर समाजाचे श्री विठ्ठल बिरदेव, खंडोबा महालिंगराया .मनग्यानसिद्ध ,हलसिद्धनाथ ,धूळदेव ,श्री मायाक्का ,भीवाईमाता ,कामाई ही कुलदैवत .या सर्व देवळातील पुजारी ब्राम्हण वा गुरव नसून धनगर समाजातीलच आसतात .या देवाच्या मूर्त्याना कोरीव नाक तोंड डोळे नसतात .गोल शाळीग्राम शेंदुराने ताबड़े रंगवलेले आसतात .आजही समाजात नैतिक जागरण करणारी असंख्य सिध्द मंडळी सर्वत्र दिसतात वालुग, सवाष्ण ,देवाच दूध ,यात्रा जत्रा या मध्ये धनगर पुजारीच असतात .ढोल कैताळ ,गजनृत्य ,याच्या तालावर सदगुण जागरण करणार "सुंबरान " सज्जनशक्ति जागरण याची भाव जागृति धनगरी ओव्यातुन आजही होत आसते. त्यामुळेच धनगर समाजात वरील सर्व सदगुण भावजागृती झाली आहे .या मुळेच या समाजा ने इतिहासात चन्द्रगुप्त ,हक्कबुक्कराय,मल्हारराव,मातोश्री अहिल्या
ते यशवंतराव पर्यन्त पराक्रमी राज्यकर्ते दिले .आजही बापू बिरु वाटेगावकर ,मध्य प्रदेशातील गुलाबी गैंग च्या संपत पाल,१९५२पासून विधिमन्डळाचे सदस्य राज तपस्वी गणपतराव देशमुख ,उत्कृष्ट प्रशाषक आणणासाहेब डांगे, अजन्म अविवाहित राहून समाजकार्य करणारे लोकबंधू महादेवजी जानकर असे व्यक्ती पेक्षा राष्ट्र मोठे मानणारे अनेक आदर्श राज्यकर्ते देशभर दिले आहेत . तरीही
आदिवासी यादीत देशभर प्रत्यक्ष समावेश आसूनही आमलबजावणी का नाही ?
धनगर सारा ऐक ! हा नारा महत्वाचा झाला आहे .स्वतंत्र भारताचे ६५ वर्षात प्रथमच धनगर समाजाचा राजकारणात विचार होतो आहे .
धनगर समाजातील नेतृत्व सर्व समाजाने लोकसभेसाठी विजयी करून या भटक्या उपेक्षित वनवासी समाजास राष्ट्रिय प्रवाहात सामिल करून घेतले पाहिजे .
विजय ग़. गावडे
संघटक ,भारतीय धनगर परिषद्



Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans