महाजनपदे आणि भारताचे शहरीकरण

इसवी.पूर्व. ६०० नंतर भारतात १६ महाजनपदांची स्थापना झाली आणि भारताचे शहरीकरण होऊ लागले. अलेक्झांडर ला राजा पुरूने सिंधू नदीच्या पूर्वेला असलेल्या राज्याच्या माहितीवरून आपल्याला समजेल की नंदा साम्राज्य हे बोगस होते.त्यावेळेस राजा पुरूने सांगितले की सिंधूच्या पूर्वेला "चंद्रमासी" (Xandrams) या राजाचे राज्य आहे.येथील राजा एका केस कपणाऱ्या वारकाचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांकडे अगोदरच्या राजाची पत्नी आकर्षित झाली होती. तो राजा अतिशय शक्तिशाली होता आणि येथील लोकांना "गंग" म्हणत. त्यांची राजधानी बिहारमधील पाटलीपुत्र नसून बंगालमध्ये होती.गंग लोक अलेक्झांडरच्या आक्रमणाला सज्ज झाले होते परंतू तो राजा अतिशय शक्तिशाली असल्यामुळे अलेक्झांडरने पुढे जाण्याचे टाळले. याशिवाय या प्रदेशात जाण्यासाठी फार मोठा वाळवंटी प्रदेश पार करायचा होता. त्यामुळे अलेक्झांडरचे आक्रमण हे फार मोठे संकट होते, चाणक्याला भारताची फार काळजी होती म्हणून त्याने चंद्रगुप्त ची निवड केली या इतिहासात काहीही तथ्य राहत नाही.

मौर्य कोण होते? मौर्य हे मेसोपोटेमियातील अमोरी(मोरी) वंशाचे लोक होते. ही जमात भटकी होती.त्यांच्या राजाला ते मेंढपाळ राजा(King Shepherd) संबोधत. इजिप्तवरती आक्रमण करणारे हेच अमोरी हे भटके लोक होते.इजिप्तमध्ये या लोकांना "हिक्सॉस"(Hyksos means king shepherd) म्हणत. इक्ष्वाकू वंश ही या लोकांतून निर्माण झाल्याची शक्यता आहे. ईराणमधील "मिदी","पसारगडे " आणि मोरी जातींचा फार घनिष्ठ संबंध होता. पर्शियाचा पहिला सम्राट सायरस(कुरुष महान) ज्या पसारगडे जमातीत जन्मला ती जमात ही मूलतः भटकी होती. राजकुमारी मंदाने ही सायरस ची आई "मिदी" वंशाची होती. मंदाने चे पारसी भाषेत मंदाना झाले आणि मोरेचे संस्कृत भाषेत मौर्य झाले.हमदान हे नाव अरब राजकुमारांत मोठ्या प्रमाणात आढळते. अरब हेही मूलतः भटकी जमात परंतू आता त्यांनी जागतिक दर्जाची शहरे स्थापन केली आहेत. त्याचप्रमाणे या लोकांनी महाजनपदाच्या काळात भारतात येऊन मोठी साम्राज्ये आणि मोठी शहरे स्थापन केली.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans