हाटकर, बरगी धनगर- परभणी आणि नांदेड जिल्ह्यात यांची संख्या अधिक असून ते शेतकी आणि शिकारी करतात.

हाटकरांची लष्करी परंपरा (भाग-५)
सिराज उल हसन, सईद लिखित 'निजामाच्या राज्यातील जाती आणि जमाती' भाग- १ यामध्ये 'हाटकर' संबंधीत असलेली माहिती मी जमेल तशी भाषांतरीत केली आहे.-
* हाटकर (पदव्या- नाईक, राव)
* हाटकर, बरगी धनगर- परभणी आणि नांदेड जिल्ह्यात यांची संख्या अधिक असून ते शेतकी आणि शिकारी करतात. त्यामानाने आदिलाबाद आणि बिदर जिल्ह्यात यांची संख्या कमी आहे. ते रांगडे, मजबूत, चपळ काया, गडद वर्ण, धीट आणि गर्विष्ठ वर्तणुकीचे आहेत. ते परदेशी वंशाचे असल्याचे दर्शवतात, स्थलांतरीत असून अलीकडच्या काळात ते स्थायिक झाल्याचे वाटते. शिवाजी महाराजांच्या लष्कर तयार करिताना प्रामुख्याने याच जातीतील लोक निवडले जात असत. "शिवाजी महाराजांचे अतिविश्वसनीय पायदळ आणि मराठा साम्राज्यातील अनेक शूर सरदार त्यातीलच एक होळकर जे सर्वात प्रतिष्ठीत, कर्तबगार याच जमातीतील होते". (यानंतर लेखकाने ऐन-ए-अकबरीमधील हाटकरसंबंधित उल्लेख केला आहे, ज्याबद्दल मी हाटकरांची लष्करी परंपरा भाग-१ मध्ये लिहिले आहे.)

Note:Kunbi/Kurmi Bahot prachin kal se Kheti karate hai.Hatkar pichale 600 sal se kheti kar rahe hai.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans