* महाराणी ताराराणी यांच्या काळात सरदार निंबाजी वाघमोडे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.

* महाराणी ताराराणी यांच्या काळात सरदार निंबाजी वाघमोडे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. सरदार निंबाजी यास "सेनाबारासहस्ञी" असा किताब असल्याची नोंद सापडते. हा किताब वाघमोडे यांना राजाराम छञपती अथवा बहामनी सुलतानांकडून देण्यात आला असावा. कारण मुस्लिम दरबारातील अनेक मातब्बर सरदार जेव्हा पक्ष बदलून छञपतींना सामील होत. त्यावेळी त्या सरदाराचा पूर्वीचा मानमरातब ,किताब वगैरे कायम राखल्याचे दिसून येते. छत्रपती शाहू मोघलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आल्यावर छञपतींच्या गादीसाठी त्यांच्यात व महाराणी ताराराणी यांच्यात वारसा कलह निर्माण झाला. त्यावेळी वाघमोडे सरदारांच्यातही भाऊबंदकी सुरू होऊन वाघमोडे सरदारांचे काही वारसदार महाराणी ताराराणी यांच्याकडे तर काही छञपती शाहूंना जाऊन मिळाल्याचे दिसून येते. महाराणी ताराराणी यांच्या पक्षाला चार बंधू राहिले त्यांना ताराराणी यांनी इ.स.वी सन १७०७ च्या सुमाराला संरंजाम दिल्याची नोंद सापडते. तर याच काळातील एका राजपञात ताराराणी यांनी वाघमोडे सरदारांना आपआपला सरंजाम वाटून घेण्याचे आदेश दिलेले दिसतात. या राजपञावर ताराराणी, रामचंद्रपंत अमात्य व आणखी एक शिक्का दिसून येतो. ज्या सरदारांचे नावे हे राजपञ दिसून येते त्यांची नावे अशी 'हिंदूराव', 'यशवंतराव', 'राणोजी' व 'तुकोजी' असल्याचे दिसून येते. अर्थातच हिंदूराव व यशवंतराव नावे नसून किताब आहेत.
* माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे
* फोटो सौजन्य- सुमित लोखंडे

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans