आपल्या प्रत्येकाच्या लग्नात भटजीने मंगलाष्टकांमध्ये "मधुपर्क पुजन करा." हे मंगलाष्टक म्हटले आहे. मधुपर्क म्हणजे गायीच्या मांसाचे सूप. आश्वलायन गृह्य सूत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, "नामांसो मधुपर्को भवति" म्हणजेच मांसाशिवाय मधुपर्क होत नाही. गाय नसल्यास दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा. हे आपल्या नामशेष संस्कृतीचे अवशेष आहेत. सावरकर गायीला उपयुक्त पशू म्हणतात, तेव्हा त्यामागे हेच संदर्भ असतात.
आश्वलायन गृह्यसूत्राचे लोकहितवादी यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
मनुस्मृतीतही यासंबंधी स्पष्ट सूचना आहेत :
मधुपर्के च यज्ञेच पितृदैवतकर्मणि ।
अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनु ॥
म्हणजेच "मधुपर्क, यज्ञ व श्राद्ध या विधिमध्येच पशु मारावेत. अन्यत्र ते मारू नयेत."
जिज्ञासूंसाठी : महाराष्ट्र सरकारने "समग्र लोकहितवादी" या नावाने तीन खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यात गृह्यसूत्राचे भाषांतर समाविष्ट आहे.

https://www.facebook.com/suryakant.palaskar/posts/1138915816150060

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans