भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज
भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र म हाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला. त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले. जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन य...