!! #होळकरशाहीचे_शूर_सरदार_वाघमारे_पाटील !!


#मराठा_साम्राज्याचा_आधारस्तंभ आणि मराठ्यांचा उत्तर हिंदुस्तानातील राजकारणातील, सत्ताकारणातील मुख्य घटक म्हणजे तब्बल २२० वर्षे राज्यकर्ते होळकर राजघराणे. पण थोडं थोडक न्हवे तर तब्बल २२० वर्षे हे राज्य टिकवण्यासाठी अनेक घराणी खर्ची पडली. त्याच घराण्यांपैकी #सरदार_वाघमारे_पाटील हे एक घराणं. होळकरांच्या प्रमुख सरदारांचा आणि जहागीरदारी चा विचार केला तर सरदार बुळे सरकार(१,९५,००० रु.), सरदार राजेवाघ (३,००,०००), सरदार फणसे(१,१५,००० रु.) या मुख्य तीन सरदारांन नंतर सर्वाधिक उत्पन्नाचा, जहागीचा प्रदेश हा सरदार वाघमारे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली होता. या घराण्याना #सावर_महल नामक जवळपास १,०५,००० रु. वार्षिक उत्पन्न असलेला प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली. #सरदार_बाबुराव_वाघमारे_पाटील यांनी मल्हारराव होळकरांनसोबत बऱ्याच लढाईत पराक्रम गाजवला, याची पोच पावती म्ह्णून यांना हा प्रदेश जहागीर म्हणून देण्यात आला. तसेच दोन्ही म्हणजे #होळकर_आणि_वाघमारे_पाटील_ही_घराणी_धनगर असल्यामुळे मल्हारबांनची आणि गौतमाबाई ची कन्या उदाबाई होळकर यांचा विवाह देखील सरदार बाबुराव वाघमारे यांच्याशी लावण्यात आला. सरदार बाबुराव वाघमारे आणि #श्रीमंत_उदाबाई_होळकर यांचा विवाह होळकरांच्या मु़ळ गावी वाफगाव या ठिकाणी झाला या विवाहाची जबाबदारी मल्हाररावांनी त्यांचा मुलगा खंडेराव यांच्यावर सोपवली होती. वाघमारे-पाटलांच मुख्य गाव हे खडकी ता. आंबेगाव (जुना जुन्नर परगाणा). या गावाची पाटीलकी पण यांच्याकडेच आहे. मल्हारबांन लढाईत केलेली मदत, होळकशाही असलेलं सुरवातीच्या काळातील योगदान पाहून पेशव्यांनी पुण्यात सन १७५० मध्ये आरसे महालात रु. ४९८ चे मंदिले देऊन सरदार बाबुराव वाघमारे यांचा सत्कार केला. तसेच नंतर च्या काळात तुकोजीं होळकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या टिपू सुल्तानवरील स्वारीतील पराक्रमासाठी सरदार बापू वाघमारे यांचा देखील १७८६ ला शिरपेच रास कर्दन रु. १५० चा देऊन सत्कार करण्यात आला. सरदार बाबुराव वाघमारे आणि उदाबाई होळकर-वाघमारे यांच्या देहांता नंतर त्यांचे पुत्र सरदार अवचिराव यांनी त्यांच्या मुख्यगावी खडकी या ठिकाणी छत्री उभारली. ती छत्री अजूनही वाघमारे सरदारांच्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे. याच छत्रीवर एक शिलालेख कोरला, शिलालेखात प्रथमच कौटुंबिक उल्लेख आहे गौतमीपासून तीन पिढ्यांचा नामनिर्देश माता-पित्याकडील आजोळघरचा उल्लेख उत्तरेकडे संवत्सर वापरले जाते, येथे सौम्य संवत्सराचा उल्लेख मल्हारराव, गौतमी, उदाबाई, बाबूराव, मानाजी, अवचितराव यांचा उल्लेख ऐतिहासिक शिलालेखातील प्रत्यक्ष मजकूर पुढीलप्रमाणे :-
श्रीगणेशाय नम:प्रतापि महाराज मल्हारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे. सके १७९१ सौम्य नाम संवत्सरे चैत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द(वडील)मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फ महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रृ उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे.
या शिलालेखांतील मजकुराचा आजच्या मराठी भाषेतील अनुवाद असा आहे-
‘पराक्रमी महाराज मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमी यांची कन्या उदाबाई, उदाबाईचे पती बाबूराव मानाजी पाटील वाघमारे यांचा पुत्र अवचितराव बाबूराव वाघमारे पाटील याने पितृ उद्धरणार्थ आणि परलोकसाधनार्थ ही छत्री ४ एप्रिल १७८९ या दिवशी बांधली. ’हाच मजकूर नदीघाटावरील शिलालेखातही सापडला आहे.
या छत्रीच्या शेजारी अमृतेश्वर चे मंदिर आहे. या छत्रीवरील कोरीव नक्षी काम सुंदर आहे. तसेच या समाधीच्या बाजूलाच नदी आहे त्या नदीवर होळकर कालीन नदीघाट बांधण्यात आला आहे. या नदीघाटावर पण शिलालेख आपणास पहावयास भेटतो. हा नदीघाट बराच मोठा आहे, होळकरशाही च्या सरदारांना शोभेल असा भव्यदिव्य आहे. कालांतराने अमृतेश्वर मंदिराची पडझड झाल्यावर वाघमारे घराण्यांनी त्याची बहीण जनाबाई लाळगे यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा जीर्णोद्धार हा १९४१ साली केला. पण अजून छत्री चा जीर्णोद्धार केला नाही, त्यावर वर बरीच झाडे झुडपे उगवली आहेत, कालांतराने हे वैभव नष्ट होण्याची भीती वाटत आहे. याच खडकी गाव वाघमारे सरदारांचा भव्यदिव्य वाडा होता, पण सध्या फक्त प्रवेशद्वार राहिलं आहे बाकी सर्व काही जमीनदोस्त झालं आहे (सदरचा वाडा कुणी बांदला याची नोंद नाही, म्हणजे होळकरांनी की वाघमारे यांनी).
इतिहास प्रेमींनी या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी. गावात तुम्हाला काळभैरवनाथ, बिरोबा, महादेव, लक्ष्मी नारायण ही पुरातन मंदिरे आहेत.
सरदार वाघमारे पाटील यांची काही घराणी आजही। होळकरांची राजधानी इंदोर येथे वास्तव्यास असून काही महाराष्ट्रत असून, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत
फोटो :- सरदार वाघमारे घराण्याची छत्री, होळकर कालीन नदीघाट, वाघमार घराण्याचा ऐतिहासिक वाड्याचे प्रवेशद्वार, अमृतेश्वर मंदिर..
फोटो साभार :- अनिल वाघमारे (खडकी), राहुल वावरे (फलटण)
संदर्भ :- होळकरशाही भाग १ (सरदारांचा परगाणा, सत्कार, मोहिमांवरील उल्लेख)
संकलन शब्दांकन :- अवधूत लाळगे

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1883542965111443


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).