गुढीपाडवा इतिहास:

गुढीपाडवा इतिहास:
गुढीपाडवा एक मंगल दिवस.गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या बलाढ्य क्षहरात(प्राकृत भाषेत:खरात) वंशी शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला.त्या काळी हा अद्वितीय असा विजयोत्सव गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?
इसवी सन.७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते.अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " क्षहरात(खखरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
एका अर्थाने हा महाविजय होता. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत(महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक) गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो.
गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात!



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).