पुर्वजांच्या आत्म्यांचे अध्यात्म आणि त्यांचा तुमच्यावरती असणारा प्रभाव
स्थानिक छोट्या मोठ्या राजवंशाना तू्म्ही एवढे डोक्यावरती घेता,त्यांचे तुम्ही देवाप्रमाणे स्वागत करता ,भ्रष्ट आणि उग्र चेहर्याचे आणि राक्षसी वृत्तीचे मंत्री,तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या पाया पडता परंतू ज्या लोकांनी या भारताचीच नव्हे या जगाची सभ्यता घडविली,अवाढव्य साम्राज्ये निर्माण केली, तुम्हाला जन्माला घातले,ज्यांच्यामुळे आज तुमचे अस्तित्व आहे त्यांना तुम्ही विसरतां? तुम्ही मुस्लिमांची गुलामी केलीत,ब्रिटिशांची गुलामी केलीत आणि आतापण साहेबांची गुलामी करण्यात फार निष्णात आहात.तूम्ही अतिशय उत्कृष्ट दास आहात.आपल्या स्वामींचे घर भरता आणि आपल्याच लोकांच्या पोटाला चिमटा काढतां.याचा अर्थ तुम्ही फक्त स्वार्थी आहात.राम-कृष्ण हे तुम्हाला फक्त दंगली घडविण्यासाठी आठवतात परंतू गुलामी मात्र रावण प्रवृत्तीच्या लोकांची करता.हयात असताना रामाला आणि त्यांच्या वंशजांना वनवास घडविणारे तुम्हीच.राजघरांण्यांत भाऊबंदकी करणारे तुम्हीच.परंतू लक्षात ठेवा की राम-कृष्णाचा आत्मा त्यांच्या वंशजातून वावरत असतो,त्यांची तुमच्यावर कायम नजर असते.रामाच्या वंशजांना आज परत वनवास आला आहे.त्याचे तुम्हाला या जन्मांतपण आणि नंतरच्या अनेक जन्मात सुद्धा फळ मिळत जातेच.कारण तुम्ही कधी सुखी-समाधानी नसता,अनेक रोगांनी तुम्हाला ग्रासले आहे.बर्याच वेळेस तुमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येतेयं.बर्याच वेळेस तुम्हाला तुमच्या तरुण आणि एकुलत्या एक मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू पहावयाची वेळ येतेयं.चांगल्या लोकांना विनाकारण त्रास देणार्या लोकांना नियतिच संपविते.
इथे तुम्ही हा शब्द मानवी वृत्तीसाठी वापरला आहे कोणत्याही जातिसमुहासाठी नाही याची नोंद घ्यावी.बर्याच जाति या फार अलिकडच्या आहेत परंतू अश्या प्रकारची वृत्ती मानवांत फार अनादी काळापासून आहे याची नोंद घ्यावी.आईवडिलांना हाकलायचे आणि परक्यांना जवळ करायचे ही वृत्ती फार अनादी काळापासून अस्तित्वात आहे.आजकालच्या मुलींपण फक्त पैंशेवाल्यांना आणि सत्ताधीशांनाच भाव देतात.
आपण या देशाचे आणि जनतेचे नोकर आहोत आणि या देशासाठी आपल्याअगोदर कोणीतरी काहीतरी केलेले आहे या जाणिवेचा फार अभाव आहे.
शेतकरी आणि मेंढपाळ हा खरा राजा आणि सर्वांचा बाप आहे परंतू आज तोच वनवासात आहे.
Comments
Post a Comment